गोंदिया - गावातील तरुणीला लग्नाचे आमिष देत तिचे वर्षभरापासून लैंगिक शोषण केले. त्यानंतर दुसऱ्याच मुलीशी विवाह ठरला. परंतु त्या उपवराने लग्नाच्या दोन दिवसापूर्वी त्या मुलीवर बळजबरीने बलात्कार केला. इतकेच नव्हे तर तिला बेदम मारहाण करण्यात आली. यासंदर्भात त्या उपवरावर आमगाव पोलिसांत तक्रार करण्यात आली. परिणामी बोहल्यावर चढण्यापूर्वीच त्या उपवराला बलात्काराच्या प्रकरणात अटक करण्यात आली.
आमगाव तालुक्याच्या किकरीपार येथील निलेश पुनाराम मोटघरे (२५) असे बलात्कारी उपवराचे नाव आहे. त्याने गावातीलच एका अल्पवयीन मुलीला मागील तीन वर्षांपासून त्रास द्यायचा. तिच्याशी जवळीक साधून त्याने तिला लग्नाचे आमिष दिले. त्या आमिषातून त्याने तिचे लैंगिक शोषण केले. वारंवार तिला लग्न करण्याचे आमिष देत तिच्यावर तो लैंगिक अत्याचार करायचा. यंदा त्याच्या घरच्यांनी त्याचे लग्न गोंदिया तालुक्याच्या नवरगावकला येथील एका मुलीशी ठरले. रितीरिवाजाप्रमाणे त्याचा वांगाभात झाला. ४ मे ला मंडपपूजन व ५ मे ला लग्न ठरले. परंतु आरोपी निलेशने लग्नाच्या दोन दिवसापूर्वी म्हणजेच ३ मे रोजी दुपारी ४ वाजता गावातील १९ वर्षाच्या त्या मुलीवर बळजबरी केली. तू मला भेटली नाही तर तुला ठार करीन अशी धमकी तो तिला देत होता. तिला तो वारंवार मारहाणही करीत होता.
३ एप्रिला देखील त्याने तिच्याशी अश्लील चाळे केले. तू माझी झाली नाहीस तर कुणाचीही होऊ देणार नाही अशी धमकी तो तिला देत होता. ३ मे रोजी पीडीता घराच्या मागील भागात शौचासाठी गेली असताना आरोपी तिथे जाऊन त्याने तिच्यावर बळजबरी केली. त्यावेळी तिने आरडाओरड केली असता आरोपीने तिला मारहाण केली. तिची हाक ऐकून नातेवाईक आले असताना आरोपी निलेश पळून गेला. निलेशचा आज ( ५ मे ) रोजी लग्न असताना बोहल्यावर चढण्यापूर्वीच त्याला आमगाव पोलिसांनी बलात्काराच्या प्रकरणात अटक करण्यात आली. हे प्रकरण दडपण्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु पीडीतेला न्याय देण्यासाठी आमगाव पोलिसांनी आपल्या कर्तव्यदक्षतेचा परिचय दिला. आरोपी विरुद्ध भादंविच्या कलम ३७६, ३५४, ३५४ ड, २९४, ३२३, ५०६ (२) सहकलम ४, ८ बाल लैंगिक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
एक वर्षापासून होत होते लैंगिक शोषण
मुलीला धमकी देत तिच्यावर एक वर्षापासून तो बळजबरी करीत होता. गावातील शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार करीत होता ही बाब डॉक्टरांच्या वैद्यकीय अहवालातूनही स्पष्ट झाली आहे.