लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत केवळ ५० टक्केच पाऊस झाला. तो देखील खंड स्वरुपात पडला. परिणामी सिंचन प्रकल्प कोरडे पडले आहेत. याचाच परिणाम भूजल पातळीवर झाला असून मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा प्रथमच भूजल पातळी २.०८ मीटरने खालावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना यंदा भीषण पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाकडून सुरूवातीपासूनच वर्तविली जात होतीे. त्यामुळे कधी नव्हे ते यंदा गोंदिया शहराला पुजारीटोला प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव आणि सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर भूजल पातळी अवलंबून असते.मात्र अल्प पावसामुळे जिल्ह्यातील लहान, मोठ्या, मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या स्थितीत केवळ २० टक्केच पाणीसाठा आहे. तर काही तलाव आताच कोरडे पडले आहेत. त्याचाच परिणाम भूजल पातळीवर झाला आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत प्रथमच आॅक्टोबर-नोव्हेबर महिन्यात जिल्ह्याची भूजल पातळी २.०८ मीटरने खालावल्याचे बोलल्या जाते.मागील वर्षी याच कालावधीत भूजल पातळी ४.१० मीटर होती. यंदा आॅक्टोबर महिन्यात भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे जिल्ह्यातील ७९ विहीरींचे निरीक्षण करण्यात आले.यात पाच वर्षांच्या तुलनेत ६६ विहिरींची पाण्याची पातळी खालावलीे असल्याचे आढळले. तर १३ विहीरींच्या पाण्याच्या पातळीत थोडी सुधारणा झाली असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.गोरेगाव तालुक्यावर सर्वाधिक परिणामकमी पावसाचा सर्वाधिक फटका गोरेगाव तालुक्याला बसला. या तालुक्यातील ३ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. या विहिरींची पाण्याची पातळी ५.१७ मीटरने खालावली आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील ११ विहिरींपैकी १० विहिरींची ४.३३ मीटरने पातळी खालावली. परंतु एका विहीरीत ०.१४ मीटरने सुधारणा झाली. आमगाव तालुक्यातील ९ विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले. यात २.६७ मीटरने पाण्याची पातळी खालावली आहे. गोंदिया तालुक्यातील १० विहीरींचे सर्वेक्षण करण्यात आले. ८ विहीरींची पाण्याची पातळी खालावली असल्याचे आढळले.भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे निरीक्षण विहीरींची पाण्याची पातळी मोजण्यात आली. यात भूजल पातळी खालवल्याचे लक्षात आले. मागील पाच वर्षांच्या कालावधीत यंदा प्रथमच भूजल पातळी २.०८ मीटरने खालावली असल्याचे आढळले.वाय.एस. वालदेवरिष्ठ भूवैज्ञानिक, गोंदिया.
जिल्ह्याची भूजल पातळी २ मीटरने खालावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:36 AM
जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत केवळ ५० टक्केच पाऊस झाला. तो देखील खंड स्वरुपात पडला. परिणामी सिंचन प्रकल्प कोरडे पडले आहेत.
ठळक मुद्देउन्हाळ्यात पाणी टंचाईचे संकट : कमी पावसाचा परिणाम