विजय रहांगडाले : हनुमान मंदिर ट्रस्टचा उपक्रम परसवाडा : सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज असून यात वेळ, पैसा, इंधन अनेक प्रकारची बचत होते. यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावयाची गरज असल्याचे प्रतिपादन आ. विजय रहांगडाले यांनी केले. हनुमान मंदिर ट्रस्टच्यावतीने शुक्रवारी आयोजीत सामूहिक विवाह सोहळ््यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून खा. नाना पटोले, सभापती उषा किंदरले, सुनील पालांदूरकर, पंचायत समिती सदस्य गुड्डू लिल्हारे, डॉ. योगेंद्र भगत, राधेलाल पटले, कैलास पटले, तुकाराम गोंधुळे, सरपंच लिला गोंधुले, सरपंच सुलक्ष्मी शामकुंवर, उपसरपंच मनीराम हिंगे, एच.आर. जमईवार, मुरलीदास गोंडाणे, नरेंद्र हिंगे, ग्रा.पं.सदस्य, संस्थेचे पदाधिकारी, ट्रस्टचे पदाधिकारी, प्राचार्य प्रभाकर लोढे, प्रा. मुंडे, प्रा. कवाने, मुकेश भगत, संजय बैस, सलाम शेख उपस्थित होते.खा. पटोले यांनी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सांगितले होते की सामूहिक विवाह करणे ही काळाची गरज भासणार व आज आपण त्यांच्या विचारांशी आत्मसात झाले व येणाऱ्या पुढील वर्षी आपण आपल्याकडून विवाह सोहळ्यासाठी लागणारा संपूर्ण खर्च आपण व ट्रस्टकडून देण्याचे आश्वासन दिले. संचालन चिंटू मिश्रा यांनी केले. आभार डॉ.सोनेवाने यांनी मानले. सोहळ््यासाठी नरेंद्र हिंगे, गजानन ढबाले, सुरेश राऊत, कांतीलाल कडव, विलास शामकुंवर, लागडू ढबाले, सुभाष रहांगडाले, डॉ. सोनेवाने व गावकऱ्यांनी सहकार्य केले. या विवाह सोहळ््याला मोठ्या संख्येत नागरिकांची उपस्थिती होती. (वार्ताहर)सात जोडप्यांचे ‘शुभमंगल’या विवाह सोहळ््यात शास्त्रोक्त पद्धतीने सात जोडप्यांचे ‘शुभमंगल’ लावण्यात आले. तर मान्यवरांच्या हस्ते मागील वर्षी परिणयबद्ध झालेल्या मनिषा बाळु ठाकरे, सुनील अशोक राऊत, डुमेश्वरी काशीनाथ राऊत, सविता देवाजी सोनेवाने, रिता प्रेमलाल कडव, प्रिमा रविंद्र वानखेडे, पुष्पा लाडकू साकुरे, सविता कुकडे यांना शासनाच्या कन्यादान योजनेअंतर्गत प्रत्येकी दहा हजार रुपयाचे धनादेश देण्यात आले.
सामूहिक विवाह सोहळे काळाची गरज
By admin | Published: April 23, 2016 1:41 AM