लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वाढती महागाई, शिक्षणाचा वाढता खर्च आणि लोकसंख्येच्या समस्येमुळे अनेकांचा कल हळूहळू छोट्या कुटुंबाकडे वाढत आहे. त्यामुळे दोन मुलांवर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याकडे जिल्ह्यातील अनेक दाम्पत्यांचा कल वाढ आहे. जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत दोन मुलांवर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या दाम्पत्यांच्या आकडेवारीत २.४८ टक्के वाढ झाली आहे. जिल्ह्यातील शहरी भागापेक्षा ग्रामीण भाग अद्यापही याबाबत मागासलेला असल्याचे चित्र आहे.छोटा परिवार सुखी परिवाराचे महत्त्व आता शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना कळू लागले आहे. शासनाच्या विविध जनजागृती मोहीमेमुळे नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण होत आहे. मुलगा असो वा मुलगी दोन मुलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून त्यांचे चांगले पालन पोषण करण्याकडे नागरिकांना कल वाढत असल्याचे चित्र दिलासा दायक चित्र आहे.आदिवासी व नक्षल प्रभावित जिल्ह्यात सन २०१६-१७ मध्ये ८ हजार ४२६ ( ९१.५९ टक्के) महिला पुरूषांनी नसबंदी केली. तर सन २०१७-१८ मध्ये ८ हजार ६५४ (९४.०७ टक्के) लोकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली. जिल्ह्यात यावर्षी ८ हजार ४३५ महिला व ७६५ पुरूषांच्या नसबंदीचे उद्दिष्ट होते. यात ७ हजार १७७ (८५.०९ टक्के) महिला व १ हजार ४७७ (१९३.०७ टक्के ) पुरूषांचा समावेश आहे. २ अपत्यानंतर ५ हजार ९८० कटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट देण्यात आले होते.जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ८ हजार ५५ तर शहरी भागासाठी १ हजार १४५ कुटुंब नियोजनाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु ग्रामीण भागात ६ हजार ९०७ (८५.७५ टक्के) तर शहरी भागात १ हजार ७४७ (१५२.२८ टक्के) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. जिल्ह्यात गोंदिया तालुक्यात १ हजार ९९० पैकी १ हजार ६८१, तिरोड्यात १ हजार २५ पैकी ७४५, गोरेगाव ८७५ पैकी ६४८, आमगाव ९१० पैकी ७६७, सडक-अर्जुनी ८०० पैकी ५६६, सालेकसा ६२५ पैकी ६०२, अर्जुनी-मोरगाव १ हजार ३० पैकी ९५९ तर देवरी ८०० उद्दिष्ट्ये असताना ९३९ लोकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली.तीन वर्षापासून घसरणजिल्ह्यातील ग्रामीण भागात मागील तीन वर्षापासून कुटुंब नियोजनात शस्त्रक्रियेत घट होत आहे. सन २०१५-१६ मध्ये ९५.३३ टक्के कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्यात. सन २०१६-१७ मध्ये ही आकडेवारी कमी होऊन ९१.५९ वर आली. सन २०१७-१८ मध्ये थोडे प्रमाण वाढून ही टक्केवारी ९४.०७ वर आली. सन २०१५-१६ या वर्षात १२८.१० टक्के कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सन २०१६-१७ मध्ये ८७.२० टक्के करण्यात आल्या. शहरात सन २०१५-१६ मध्ये ४२.६० टक्के, सन २०१६-१७ शहरी भागातील आकडेवारी १२२.४५ होती. परंतु सन २०१७-१८ मध्ये ही आकडेवारी अनुक्रमे ८५.७५ टक्के, १५२.५८ टक्के आहे.जन्मदरावरही पडला प्रभावजिल्ह्यात कुटुंब नियोजनाचे टार्गेट मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे. याला एक कारण जन्मदरात झालेली घट हा सुध्दा आहे. जिल्ह्यात सन २०१५-१६ मध्ये १८ हजार ९३६ प्रसूती झाल्या. सन २०१६-१७ मध्ये १६ हजार ४९० तर सन २०१७-१८ या वर्षात ही आकडेवारी १५ हजार ६०२ वर आहे.जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील लोकांच्या विचारसरणीत फरक असतो. ग्रामीण भागातील कुटुंब वारसदार म्हणून मुलाची वाट पाहतात. त्यामुळे कुटुंब नियोजन करीत नाहीत. यामुळे शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील कुटुंब नियोजनाची टक्केवारी ही कमीच असते.-डॉ.श्याम निमगडेजिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. गोंदिया.
छोट्या कुटुंबाकडे वाढतोय कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 9:33 PM
वाढती महागाई, शिक्षणाचा वाढता खर्च आणि लोकसंख्येच्या समस्येमुळे अनेकांचा कल हळूहळू छोट्या कुटुंबाकडे वाढत आहे. त्यामुळे दोन मुलांवर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याकडे जिल्ह्यातील अनेक दाम्पत्यांचा कल वाढ आहे.
ठळक मुद्देग्रामीण भागात समस्या कायम : जिल्ह्यात देवरी तालुका सर्वात पुढे