नाना पटोले : व्यापाऱ्यांच्या कार्यशाळेत वस्तू व सेवा कराची माहिती लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : सर्वसामान्य व्यापाऱ्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी व प्रशासनातील इन्स्पेक्टर राज संपविण्यासाठी करप्रणालीत संविधानिक दुरूस्ती करु न वस्तू व सेवाकर अर्थात जीएसटी लागू करण्यात येत आहे. कोणत्याही व्यापाऱ्याने न घाबरता जीएसटी म्हणजे काय आणि यासंदर्भात हेतूपुरस्सर पसरविण्यात आलेले गैरसमज दूर करणे आवश्यक आहे, असे मत खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केले. मंगळवारी २७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विक्रीकर विभाग, व्यापारी संघटना व खासदार जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने सेवा व वस्तू कराबाबत गैरसमज दूर करण्यासाठी आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना खा.पटोले बोलत होते. यावेळी विक्र ीकर उपायुक्त शीला मेश्राम, सहायक विक्रीकर आयुक्त पी.एच. मालठाणे, विक्रीकर अधिकारी पी.जी. नेवारे, आर.जी. मडावी, माजी जि.प. उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, व्यापारी संघटनेचे बग्गा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. खासदार पटोले म्हणाले, व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी जीएसटी लागू करण्यात येत आहे. या कायद्यात आता बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या आहेत. छोट्या व्यापाऱ्यांना काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. जीएसटीची प्रत्येक व्यापाऱ्यांनी नोंदणी करावी. देशातील व्यापारी वर्ग प्रामाणिकपणे कराचा भरणा करून देशसेवा करीत असला तरी त्यांच्याकडे कुत्सित नजरेनेच बघितले जाते. सर्व वेगवेगळे कर एकित्रत भरु न आता जीएसटी लागू करण्यात आले आहे. या संदर्भात अनेक गैरसमजुती असल्याचे सांगून खा.पटोले म्हणाले, त्या दूर करणे तसेच कायद्यात काही त्रुट्या असल्यास जीएसटीसाठी गठीत समितीसमोर त्या आणून देणे यादृष्टीने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कुठलीही नवीन व्यवस्था लागू करण्यात अडचणी येतातच, याचा विचार करून सर्व व्यापारी बांधवांनी जीएसटीबद्दल असलेली भीती काढून त्यातील तरतूदी समजून घ्याव्यात. तसेच जीएसटी नोंदणीसाठी येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी सदर कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी व्यापाऱ्यांनी विविध शंका उपस्थित केल्या व अनेक बाबी अशा अडचणी करणाऱ्या आहेत हे प्रत्यक्ष उदाहरणाद्वारे समजून दिले. विक्रीकर उपायुक्त शीला मेश्राम तसेच सहायक विक्रीकर आयुक्त पी.एच. मालठाणे यांनी व्यापारी, व्यापारी संघटनाचे प्रतिनिधी, कंत्राटदार यांच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देवून शंकांचे समाधान करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रसंगी शहरातील व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी, भाजपाचे शहर अध्यक्ष सुनील केलनका, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक रेखलाल टेंभरे, राजू नोतानी, नगरसेवक बंटी पंचबुध्दे व इतर व्यापारी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इन्स्पेक्टर राज संपविण्यासाठी जीएसटी
By admin | Published: June 29, 2017 1:17 AM