शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
4
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
5
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
6
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
7
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
8
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
9
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

शिक्षकांच्या अपडाऊनवर गाजली पालक सभा

By admin | Published: August 26, 2014 12:04 AM

येथील छत्रपती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक-पालक संघाची सभा शनिवारी पार पडली. मात्र या सभेत पालकांनी शिक्षकांच्या अपडाऊनचा विषय छेडून सभा गाजविली. या सभेत विविध

पांढरी : येथील छत्रपती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक-पालक संघाची सभा शनिवारी पार पडली. मात्र या सभेत पालकांनी शिक्षकांच्या अपडाऊनचा विषय छेडून सभा गाजविली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक के.जी. परशुरामकर होते. पालक संघाच्या सभेत मोठ्या प्रमाणात पालक वर्गांने हजेरी लावली होती. सभेत शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सल्लू पठान यांनी शाळेतील शिक्षक प्रार्थनेच्या वेळेत हजर राहात नसून उशिरा येत असल्याचा विषय मांडला. त्याचप्रकारे मध्यांतरच्या सुटीमध्ये येथील काही शिक्षक रेल्वे स्टेशनवर फिरताना दिसत असल्याचा विषय मांडत अशांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला. यावर सभेला उपस्थित काही पालकांनी शिक्षक अपडाऊन करीत असल्याचा विषय छेडला. कारण या शाळेत अंदाजे २० ते २४ कर्मचारी असून रोज साकोली, सडक/अर्जुनी, गोंदियावरुन उपडाऊन करित आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा परिणाम जाणवत असल्याचे मत पालकांनी मांडले. एवढेच नाही तर शिक्षक या भागात राहत नसतानाही मुख्यालयी राहण्याचा दाखला घेत असतात व त्याचा फायदा घेत असल्याचाही प्रकार पालकांनी उघडकीस आणला. हा गंभीर विषय असून असले प्रकार खपवून न घेता संबंधित शिक्षकांवर कारवाई करावी व मुख्यालयी राहणे अनिवार्य करावे अशी मागणी केली. या शाळेत ५ ते १२ वी पर्यंत वर्ग असून सुमारे एक हजार ते बाराशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र शिक्षकांच्या अशा या वागणुकीमुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालक गंभीर असून त्यांचा हा रोष या सभेत दिसून आला. यामुळेच पालकांनी ही सभा गाजवून सोडली. सभेचे संचालन विजय बिसेन यांनी केले. आभार नाकाडे यांनी मानले. (वार्ताहर)