शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

पालकमंत्री व खासदारांनी घेतला डॉक्टरांचा ‘क्लास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 6:00 AM

‘लोकमत’ने याकडे लक्ष वेधत गंगाबाईचे जिवंत चित्रण समाजासमोर मांडल्याने खळबळून जागे झालेले लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे अधिकारी फक्त गंगाबाईवरच बोलू लागले. खासदार मेंढे यांनी रविवारी (दि.३) चक्क गंगाबाई स्त्री रूग्णालय गाठले व ‘लोकमत’ वृत्तपत्र समोर ठेवून तेथील एक-एक बाबी टिपून डॉक्टरांच्या कानपिचक्या घेतल्या. वैद्यकिय अधिष्ठाता डॉ. पी.व्ही. रूखमोडे यांच्यासह गंगाबाईत सद्धा कार्यरत असलेले डॉक्टर तिथे उपस्थित होते.

ठळक मुद्दे‘लोकमत’च्या वृत्ताची दखल : मुंबईची चमू ही झाली दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय हे गर्भवतींसाठी वरदान ठरण्यापेक्षा आता अभिशाप ठरण्याच्या मार्गावर आहे. मागील चार दिवसांपासून रूग्णालयातील प्रसूती बंद असल्याने ‘लोकमत’ने यावर प्रकाश टाकला. याची दखल घेत रविवारी (दि.३) पालकमंत्री डॉ. परिणय फुके व खासदार सुनील मेंढे यांनी गंगाबाईतील डॉक्टरांचा क्लास घेतला.१ नोव्हेंबरपासून डॉक्टर सेवा देण्यास राजी नसल्यामुळे तसेच डॉक्टरांची पदे रिक्त असल्याचे सांगून १ नोव्हेंबर पासून प्रसूती बंद करण्यात आली. ‘लोकमत’ने याकडे लक्ष वेधत गंगाबाईचे जिवंत चित्रण समाजासमोर मांडल्याने खळबळून जागे झालेले लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे अधिकारी फक्त गंगाबाईवरच बोलू लागले. खासदार मेंढे यांनी रविवारी (दि.३) चक्क गंगाबाई स्त्री रूग्णालय गाठले व ‘लोकमत’ वृत्तपत्र समोर ठेवून तेथील एक-एक बाबी टिपून डॉक्टरांच्या कानपिचक्या घेतल्या. वैद्यकिय अधिष्ठाता डॉ. पी.व्ही. रूखमोडे यांच्यासह गंगाबाईत सद्धा कार्यरत असलेले डॉक्टर तिथे उपस्थित होते. त्यातच पालकमंत्री फुके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावून गंगाबाईचे प्रश्न ऐकून ते कसे सोडविले जातील यावरच चर्चा करण्यात आली.केटीएस अधिनस्त असलेल्या गंगाबाईचा कारभार आता वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून चालत आहे. वैद्यकीय अधिष्ठाता यांच्या उदासिनतेमुळे गंगाबाईत रूग्णांना दाखल करण्यास डॉक्टर मनाई करीत आहेत. मेडीकल कॉलेजकडे गंगाबाईचा कारभार आला तेव्हापासून गंगाबाईचा विकास किती केला याची माहिती पालकमंत्र्यांसमोर जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी वैद्यकीय अधिष्ठाता यांना मागितली. तर खासदारांनी रूग्णांशी संवाद साधला. पालकमंत्र्यांनी काय हवे ते सांगा मात्र समस्या सोडवा अशी तंबी दिली. १४ लाख लोकसंख्येसाठी असलेल्या एकमेव गंगाबाईत प्रसूती करणे चार दिवसांपासून बंद असल्याने मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. लहाने व नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल दाखल झाले. त्यांनीही गंगाबाईचा आढावा घेतला. त्याचप्रकारे आमदार विनोद अग्रवाल यांनी डॉ. लहाने व डॉ. जायस्वाल यांच्या सोबत चर्चा करून रूग्णालयातील सेवा सुरळीत करण्याचे निर्देश दिले.खासदारांच्या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते गज्जू फुंडे, अधिष्ठाता डॉ. रूखमोडे, अधीक्षक डॉ.सुवर्णा हुबेकर, शल्य चिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके, डॉ. राजश्री पाटील, डॉ.गरिमा बग्गा उपस्थित होते.गंगाबाईला तीन कोटी मिळणारगंगाबाईतील समस्या निवारणासाठी जिल्हा नियोजन निधीतून तीन कोटी रूपये देण्याची तयारी पालकमंत्री डॉ. फुके यांनी दर्शविली. औषधे व इतर साहीत्य खरेदी करून सेवा सुरळीत करण्यासाठी लागणारा निधी म्हणून तीन कोटी रूपये जिल्हा नियोजन निधीतून देणार असल्याचे सांगितले.सहा डॉक्टरांची पर्र्यायी व्यवस्थापालकमंत्र्यांनी फटकारल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रु खमोडे यांनी सोमवारी (दि.४) प्रसूती सेवा बहाल करण्यासाठी सहा डॉक्टरांची पर्यायी व्यवस्था म्हणून डॉ. सायास केंद्रे, डॉ. आशा अग्रवाल, डॉ. शीतल खंडेलवाल, डॉ. राजश्री पाटील, डॉ. गरिमा बग्गा, व डॉ. सविता वडेरा यांना पाठविले. हे सर्व डॉक्टर आठ-आठ तासांची नोकरी करणार असे सांगण्यात आले.चवथ्या दिवशीही प्रसूती बंदचपालकमंत्री व वैद्यकीय संचालक यांनी फटकारल्यानंतर सहा डॉक्टरांची नियुक्ती करतो म्हणून गाजावाजा करण्यात आला. डॉ. आशा अग्रवाल यांना सोमवारी (दि.४) आदेश मिळाले परिणामी त्यांनी लगेच कार्यभार सांभाळला. परंतु त्यांच्या मदतीला कुणीच डॉक्टर नसल्यामुळे सोमवारी (दि.४) गंगाबाईत प्रसूती होऊ शकली नाही. आमदार, खासदार, पालकमंत्री व वैद्यकीय शिक्षण संचालक यांच्या आदेशावरूनही गंगाबाईत चवथ्या दिवशीही प्रसूती होऊ शकली नाही असे सांगण्यात आले. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल