लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील स्वस्त धान्य वितरण प्रणालीत मोठ्या प्रमाणात अनिमियतता असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. मात्र याकडे या विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले असल्यावरुन पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी चांगलेच फटकारले. तसेच यात त्वरीत सुधारणा करण्याचे निर्देश दिले.जिल्हा दक्षता समितीची बैठक मंगळवारी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. दक्षता समितीचे पालकमंत्री हे पदसिध्द अध्यक्ष असतात. मात्र आजवर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत या समितीची बैठक झाली नव्हती.जिल्हाधिकारी अथवा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या उपस्थितच ही बैठक पार पडत होती. मात्र पालकमंत्री फुके यांनी प्रथमच या बैठकीला उपस्थिती लावून सार्वजनिक व स्वस्त धान्य वितरण प्रणालीचा आढावा घेतला.या वेळी त्यांनी विविध योजनेतंर्गत शिधापत्रिकाधारकांना किती अन्न धान्याचे वाटप केले जाते, शालेय पोषण आहार, गोदामांची स्थिती, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातंर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजनांचा अधिकाºयांकडून आढावा घेतला. बैठकीला आ.विजय रहांगडाले, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल खांडेभराड आणि सर्वच तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.धानाची वेळेत उचल का नाहीजिल्ह्यातील शासकीय गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केलेला धान पडून आहे. त्याची वेळीच उचल केली जात नसल्याने धान खराब होत असून त्यातील पोषकत्त्व कमी होत आहे.धानाची वेळेत भरडाई केली जात नसून संपूर्ण व्यवस्था ढासळली असल्यावरुन जिल्हा पुरवठा अधिकारी आणि जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांना चांगलेच फटकारले.धानाच्या भरडाईचे काम काही मोजक्याच राईस मिलर्सला दिले जात असल्याने तांदळाचा दर्जा घसरत चालला आहे.राईस मिलर्सनी धानाची उचल केल्यानंतर १५ दिवसात धानाची भरडाई होणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री फुके यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.शाळांना अन्न धान्याचा पुरवठा कराजिल्ह्यातील शाळांना पोषण आहारासाठी स्वस्त धान्य दुकानातून अन्न धान्याचा पुरवठा केला जात होता. मात्र मागील काही महिन्यांपासून तो बंद असल्याची माहिती पालकमंत्र्यांना काही नागरिकांनी दिली. यावर त्यांनी त्वरीत शाळांना नियमित अन्न धान्याचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले.
पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी फटकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 6:00 AM
आजवर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत या समितीची बैठक झाली नव्हती.जिल्हाधिकारी अथवा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या उपस्थितच ही बैठक पार पडत होती. मात्र पालकमंत्री फुके यांनी प्रथमच या बैठकीला उपस्थिती लावून सार्वजनिक व स्वस्त धान्य वितरण प्रणालीचा आढावा घेतला.
ठळक मुद्देदक्षता समितीची बैठक : पहिल्यांदाच पालकमंत्र्यांची उपस्थिती