शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

वन विभागाच्या चित्ररथाला पालकमंत्र्यांची भेट

By admin | Published: May 09, 2017 12:56 AM

वन विभागाने तयार केलेल्या चित्ररथाची शनिवारी (दि.६) पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी पाहणी करु न चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून प्रवासासाठी रवाना केले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वन विभागाने तयार केलेल्या चित्ररथाची शनिवारी (दि.६) पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी पाहणी करु न चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून प्रवासासाठी रवाना केले. यावेळी आमदार गोपालदास अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर, सहायक वन संरक्षक श्री.बिसेन, श्री.शेंडे, वन्यजीव अभ्यासक मुकुंद धुर्वे यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच वन विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने जिल्हा क्र ीडा संकुल येथे आयोजित या कार्यक्र माला उपस्थित होते.बिघडलेले पर्यावरण संतुलन आणि जागतिक तापमान वाढीमुळे वृक्ष लागवड करणे ही आज काळाची गरज झाली आहे. येत्या तीन वर्षात राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या वृक्ष लागवडीत लोकसहभाग मिळावा आणि मोहिमेला लोकचळवळीचे स्वरु प यावे यासाठी वन विभागाने चित्ररथ तयार केले असून १ मे रोजी चंद्रपूर येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. वन विभागाचा हा चित्ररथ चंद्रपूर, गडचिरोली मार्गे गोंदिया जिल्ह्यात दाखल झाला. हा चित्ररथ राज्यभर भ्रमण करणार असून वन व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी पुढे येण्याचे व ग्रीन आर्मीत सहभागी होण्याचे आवाहन चित्ररथातून केले जाणार आहे. चित्ररथाच्या मागच्या भागात मोठी डिजीटल स्क्र ीन असून ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे महत्व पटवून दिले जाणार आहे. १ मे ते ३० जून पर्यंत हा चित्ररथ चांदा ते बांधा असा महाराष्ट्रभर प्रवास करु न सर्वच जिल्ह्यात जनजागृती करणार आहे.सडक अर्जुनीत स्वागत सडक अर्जुनी : रविवारी (दि.७) सकाळी ९.३० वाजता शेंडा फाटा येथे चित्ररथाचे स्वागत करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती कविता रंगारी, नगराध्यक्ष रिता लांजेवार, माजी आमदार दयाराम कापगते, नायब तहसीलदार अखिलभारत मेश्राम, कोहमाराच्या सरपंच माया उईके, वनक्षेत्र अधिकारी गोवर्धन राठोड, क्षेत्र सहायक प्रमोद फुले, विलास बेलखोडे, सुनील खांडेकर, नागपुरे, वनरक्षक अरविंद बडगे, रमेश काळबांधे, राजेश कठाणे, लिना पटोले आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी वनाचे महत्व, वृक्षारोपण काळाची गरज, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काय केले पाहिजे याची माहिती देण्यात आली.चित्ररथाला हिरवी झेंडीसालेकसा : पर्यावरणाचा संतुलन साधण्याच्या दिशेने काम करणे गरजेचे असून यासाठी वृक्ष संरक्षण व वृक्ष संवर्धन सारखे उपक्रम गांभीर्याने राबविणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने वृक्ष लागवडीचा हा उपक्रम हाती घेतला असून लोकांमध्ये जनजागृती आणण्यासाठी चित्ररथ यात्रा काढण्यात येत आहे. या चित्ररथाचे नुकतेच सालेकसा येथे आगमन झाले. त्यावेळी वन विभाग आणि महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सदर चित्ररथाचे भव्य स्वागत केले. वृक्ष लागवडीचा संदेश देणाऱ्या या चित्ररथाचे स्वागत करण्यासाठी सालेकसाचे वन परिक्षेत्राधिकारी सदानंद अवगान, क्षेत्राधिकारी पी.एस. मेंढे, एस.के. पटले, एस.ए. घुघे, पी.बी. साखरे, वनरक्षक एम.व्ही. शामकुवर, एस.आर. सोनवाने, एम.आर. येटरे, ई.सी. कापसे, एस.एल. पांडे, एस.बी. भेलावे, डी.डी. कटरे, एस.बी. कटरे, वाय.सी. नागपुरे, एम.आर. येटरे, ए.बी. मेश्राम, बी.एम. र हांगडाले, डी.डी. कोकोडे, मिलिंद मेश्राम, सुनील रहांगडाले आदी वन विभागाच्या कार्यालयसमोर उपस्थित दर्शविली आणि चित्ररथाचे स्वागत केले. चित्ररथाबद्दल यावेळी सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर सालेकसा येथे नगर भ्रमण करुन शेवटी हिरवी झेंडी दाखवून आमगावकडे रवाना करण्यात आले.