शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
2
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
3
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
4
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
5
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
6
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
7
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
8
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
9
Pushpa 2: १००-२०० नाही तर तब्बल इतके कोटी, 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतलं तगडं मानधन
10
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
11
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
12
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
13
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
14
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
15
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
16
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
17
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
18
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
19
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
20
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल

देशाचे रक्षकच निघाले भक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 10:40 PM

केंद्र आणि राज्यातील सत्तारुढ सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले. मात्र प्रत्यक्षात देशात नेमके या विरोधात चित्र आहे. देशाचे रक्षकच भक्षक झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण देशाचे चौकीदार असल्याचे सांगितले होते.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : तालुका काँग्रेस कार्यकर्ता मेळावा, सरकारवर टीका

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : केंद्र आणि राज्यातील सत्तारुढ सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले. मात्र प्रत्यक्षात देशात नेमके या विरोधात चित्र आहे. देशाचे रक्षकच भक्षक झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण देशाचे चौकीदार असल्याचे सांगितले होते. पण सध्या देशात लुटालूट सुरु आहे.पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जिवनावश्यक वस्तुंचे दर सातत्याने वाढत आहेत. विद्यमान सरकारच्या धोरणांनी जनता त्रस्त झाली असून अशा खोटारड्या सरकारला जनतेनेच धडा शिकविण्याचे आवाहन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले. तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळावा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित करण्यात आला.या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा महासचिव सहषराम कोरोटे, माजी मंत्री भरत बहेकार, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष एन.डी. किरसान, माजी आ. रामरतन राऊत, उषा हर्षे, माजी तालुकाध्यक्ष नटवरलाल गांधी, शंभुप्रसाद शुक्ला, रामसिंग चव्हाण, सरपंच उषा भांडारकर, इसुलाल भालेकर, संदीप भाटीया, यादवलाल बनोठे, विजय टेकाम, सालेकसाचे अध्यक्ष वासुदेव चुटे, बाबू मेंढे, देवचंद ढेकवार, संजय डोये, राधेलाल रहांगडाले, प्रमिला उपराडे,माजी सरपंच जमिल खान, युवा अध्यक्ष शंकर रहांगडाले, गणेश हुकरे,अजय खेतान, रामकिसन शिवणकर,अरुणा बहेकार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व महात्मा गांधी यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन करण्यात आली.अग्रवाल म्हणाले, देशात सर्वसामान्य माणूस दु:खी असून जनतेला रस्त्यावर उतरण्याची पाळी आली आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी घरोघरी जावून सामान्य जनतेला जागृत करण्याचे कार्य करण्याचे आवाहन केले.कोरोटे म्हणाले आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे हाल गंभीर असून गावातील रस्ते खड्डेमय झाले आहे. परिणामी अपघातात वाढ झाली असून त्यात अनेकांचा नाहक बळी जात आहे. तर शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे अशा विश्वासघाती सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर उघड करण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे.कार्यक्रमाचे संचालन जगदीश चुटे यांनी केले तर आभार इसुलाल भालेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केवलचंद शेंडे, दीपक शर्मा, दिगंबर कोरे, महेश उके, उज्वल ठाकूर, श्रावण शिवणकर, प्रकाश फुंडे, गुणवंत पटले, किरण चुटे, शहवी खान, निलकंठ वाढई, रमेश चुटे, बुधराम विठ्ठले, नंदलाल पाथोडे, राजकुमार चव्हाण, मनिषा शिवणकर, धनवंता शिवणकर, भागवत रहिले, सुबोध शहारे, रामेश्वर चौधरी, गितेश्वरी शिवणकर, पारबता कटरे, आनंद शेंडे, नरेश बोपचे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल