बाराभाटी : सर्वत्र उन्हाचा टाहो, सगळीकडे तेजोमय सूर्याची तीव्र किरणे आग ओकत आहेत. अशावेळी माणवाला जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे. तसेच इतरही प्राण्यांना पाण्याची गरज आहे, असे येरंडी येथे दिसून आले. पिण्याच्या पाण्यासाठी भटकलेली माकडे चक्क पाहुण्यासारखे घरासमोर आल्याचे चित्र येथे दिसून येते. माणसाप्रमाणे माकडेसुध्दा प्राणीच आहेत. माणवाची उत्पत्ती करणारे हेच प्राणी आहेत. म्हणून याचा संबंध मानवाशी भावनीक होवून जातो. सकाळी १० वाजता येरंडीच्या लगत असणाऱ्या अमराई जवळील घरासमोरच चक्क अर्धा तास ७-८ बादल्यांनी १५ माकडांना पाणी पाजून नाती जोडण्याचा उपक्रम विशाल रामचंद्र गेडाम यांनी जपला. यांना मदत म्हणून वयाची कुठलीही काळजी न करता व चमकणारी उन्ह सहन करीत ‘प्या रे प्या पाणी’ असा स्वर गुणगुणत सत्यभान दयाराम रंगारी यांनी पाणी पाजले. असा भावनाशील उपक्रम पाहून डोळ्यात चमक निर्माण झाली व १९२७ ला चवदार तळ्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण झाली. त्यांनी मानवाला पाणी पाजले आणि मानवांची उत्पत्ती करणारा प्राण्यास मानवाने पाणी पाजले. असे चित्र पाहून मन हेलावून गेले व अंतर्मनात साठवण्याजोगा प्रसंग या नागरिकांच्या हातून घडल्याचे त्यांना समाधान झाले. अलीकडे महाराष्ट्राचा बराच भाग तहानलेला आहे. मानव, प्राणी, पक्षी-पशू तहानेने व्याकूळ दिसतात. पाणी न मिळताच सदर प्राणीमात्रांना कधी-कधी प्राणसुध्दा सोडावा लागतो. मिळेल त्या ठिकाणचे पाणी प्यावे लागते. तहानलेल्या मनात असा प्रसंग नक्की घर करून बसतो. सर्व प्राणीमात्रांनी जीवन जगाव, असा गांभीर्यबोध यांनी दिला. अनेक नागरिकांकडे कधीच वेळ नसते. पण स्वत: काम सोडून पाहुण्या माकडांना पाणी पाजण्याचे काम प्रथम परिसरात पहायला मिळते. अमराईत आंबे नाहीत, पण जिवंत राहण्यासाठी काही तरी खावू अन् दिवस काढू, असा प्रसंग माकडांसमोर असेल. पण हिंमत न हारता पाण्यावरच दिवसे काढता येतील, असा बेताने गावाकडे पाहुणे म्हणून ही माकडे आलीत. सोबत स्वत:च्या पिलांनाही आणले.
पाण्यासाठी पाहुणे माकड गावांत
By admin | Published: May 27, 2016 1:36 AM