लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : ठाणा येथील धान उत्पादक व श्री पध्दत लागवड करणाºया शेतकºयांना आमगाव फार्म्स प्रोड्युसर कंपनी ठाणा या कार्यालयात कृषी सहायक सुषमा शिवणकर व राहुल शेंगर यांनी सेंद्रिय कीड व रोग व्यवस्थापन व माती प्रशिक्षणाबाबत माहिती दिली. अध्यक्षस्थानी तंमुसचे अध्यक्ष बाबुराव कोरे होते.आज बहुतेक शेतकरी कीड व रोग नियंत्रणासाठी फक्त रासायनिक कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे अनेक दुष्परिणाम होत आहेत. यात रस शोषणाºया किडींचे प्रमाण वाढते. निसर्गातील प्राणी-पक्षी यांचीसुध्दा हाणी होते. माणसाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. शेतकºयांना शेतीविषयी कीडनाशक औषधीसंबधी माहिती देण्यात आली.याप्रसंगी प्रामुख्याने आत्माराम गायधने, बेंदराज बोपचे, प्रमोद वंजारी, श्रीरंग बेंदवार, राधेश्याम खोब्रागडे, भोजराज बेंदवार, सुरेश मेश्राम, किशन कोरे, सोमा फुंडे, गजानन मेश्राम, सुधीर बागडे, नटराज बावणथडे, सीताराम बोपचे, दूधराम रंगारी, श्रीराम मलिहा आदी उपस्थित होते.
समृद्ध शेतीवर मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 9:30 PM
ठाणा येथील धान उत्पादक व श्री पध्दत लागवड करणाºया शेतकºयांना आमगाव फार्म्स प्रोड्युसर कंपनी ठाणा या कार्यालयात कृषी सहायक सुषमा शिवणकर व राहुल शेंगर यांनी सेंद्रिय कीड...
ठळक मुद्देसेंद्रिय कीड व रोग व्यवस्थापन व माती प्रशिक्षणाबाबत माहिती