तिरोडा : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील वर्षभरापासून व्याघ्र प्रकल्प व पर्यटनस्थळे बंद आहेत; त्यामुळे यावर अवलंबून असलेेले गाइड आणि जिप्सीचालकांवर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. अशा कठीण परिस्थितीत अदानी फाउंडेशनने जिल्ह्यातील नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील गाईड आणि जिप्सीचालकांना अन्नधान्याच्या किटचे वाटप करून मदतीचा हात दिला आहे.
कोरोनाचा सर्वाधिक फटका पर्यटन आणि हॉटेल व्यावसायिकांना बसला. नवेगावबांध-नागझिरा गाइड आणि जिप्सीचालकांवर पर्यटनस्थळे बंद असल्याने उपासमारीची वेळ आली होती. याचीच दखल घेत अदानी फाउंडेशन अन्नधान्याचे किट उपलब्ध करून दिले. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील १५९ गाइड व जिप्सीचालकांना रेशन किट वाटप करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने क्षेत्रसंचालक आर. रामानुजन, रत्ना बिश्वास, पूनम पाटे, अदानी फाउंडेशनचे प्रमुख नितीन शिराळकर, रूपाली सावंत, चिवंडे, आदी उपस्थित होते. स्वप्निल वाहने, दोरले, पटेल यांंनी सहकार्य केले.