गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त सगळ्या सेवेकरींनी श्री स्वामी समर्थांचे गुरुपद घेतले. विशेष म्हणजे, श्री स्वामी समर्थ केंद्रातून चावविल्या जाणाऱ्या बालसंस्कार, प्रश्नोत्तरी, प्रशिक्षण, वास्तुशास्त्र, कृषी, देश-विदेश, पर्यावरण प्रकृती, विवाह संस्कार, युवा प्रबोधन, शिशु संस्कार, पालकत्व, दुर्ग संवर्धन, आरोग्य, स्वयंरोजगार, कायदा आदी विभागांवर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. गुरूपौणिमेनिमित्त समर्थांची महाआरती व गुरूपूजन करण्यात आले. प्रसाद वितरणाने उत्सवाची सांगता करण्यात आली. गुरूपौर्णिमेचा कार्यक्रम हा कोरोनाचे सगळे नियम पाळून करण्यात आला. कार्यक्रमासाठी कांचन बालपांडे, चैतन्य बालपांडे, निशिकांत कावळे, शरद चव्हाण, स्वाती पवार, मनीषा पवार, राहुल देवतारे, कल्पना देवतारे, उमा कावळे, आलोक पवार, संतोष पवार, दत्तात्रय नाईक, पूनम चव्हाण, पूजा कुमार, आशिष कुमार आदी सेवेकरींनी सहकार्य केले.
श्री स्वामी समर्थांच्या केंद्रात गुरूपौर्णिमा साजरी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 4:24 AM