शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

गात्राच्या जांभळांची गोंदियात चलती

By admin | Published: June 12, 2017 1:31 AM

केवळ पूर्व विदर्भात मोठ्या आणि जांभळसर रंगाची जांभळे मोठ्या प्रमाणात विक्रीला येत असतात.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केवळ पूर्व विदर्भात मोठ्या आणि जांभळसर रंगाची जांभळे मोठ्या प्रमाणात विक्रीला येत असतात. या जांभळांची चव काहीशी तुरट असल्याने ती अनेकांच्या पचनी पडत नाहीत. नागपूरसारख्या शहरात एखादवेळी गावरान जांभळं दिसतात. जी काळी असतात. चवीला मधुर आणि गोड असतात. अशी ही जांभळं गोंदिया जिल्ह्यातील गात्रा या गावात मोठ्या प्रमाणात होतात. गोंदियात सध्या गल्लोगल्ली फिरणाऱ्या विक्रेत्यांकडे ही जांभळं मोठ्या प्रमाणात विक्रीला आली असून, बाहेरगावची मंडळी मोठ्या चवीने ही जांभळं खात आहेत. जांभूळ म्हटले की तोंडाला आपसूकच पाणी सुटते. कडक उन्हाने तोंडाची घालवलेली चव येण्यासाठी जांभूळच योग्य उपचार आहे. बाजारात दाखल झालेली जांभळं बघितल्यानंतर ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली...’ हे गीत सहज ओठांवर येते. गोंदियात गल्लीबोळात हातगाड्यांवरील फळविक्रेत्यांकडे गात्राची जांभळं ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. जून महिना हा गर्द निळ्या-काळ्या जांभळांचा असतो. जिभेचे चोचले पुरविणारे जांभूळ आणि निसर्गाचे अतूट नाते आहे. ढगांना वेध लागतात पावसाचे तर जांभळांना वेध लागतात पिकण्याचे. अशी महती असलेल्या जांभळांनी फळबाजारात हळुवार शिरकाव केला आहे. सध्या गोंदियाच्या बाजारपेठेत दाखल् झालेली अस्सल गावरान जांभळं बालाघाट परिसरातील गात्रा या भागातून येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व छत्तीसगड या भागात उत्पादित होणारी मोठ्या आकाराची जांभळं सध्या बाजारपेठेत विक्रीस आलेली नाहीत. सध्या गोंदियात गल्लोगल्लीत गावरान जांभळं घेऊन विक्रेते फिरत आहेत. प्रतिशेर १० रुपये भावाने जांभळांची विक्री होत आहे. जांभूळ या वृक्षाची पाने गुरे-ढोरे मोठ्या चवीने चाखतात. गोंदिया तालुक्यातील मोठा परिसर आणि लगतच्या बालाघाट जिल्ह्यातील परिसरातसुद्धा सर्वाधिक जांभळाची झाडे रानावनात दृष्टीस पडतात. गत काही वर्षांपासून अवैध वृक्ष कटाईमुळे रानावनात असलेली जांभळाची झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. वन विभागाने आयुर्वेदिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या जांभळाचे वृक्ष वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सूर वृक्षप्रेमींनी काढला आहे.मुंबईकर नागरिक रानावनात उत्पादित होणारी जांभळं खाणे पसंत करीत असल्यामुळे व्यापाऱ्यांनी अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व गोंदिया जिल्ह्यातील गात्रा येथील जांभळांची अधिक मागणी नोंदविली आहे. सध्या जांभळांचा हंगाम वाढला असल्याने १० रुपये प्रतिशेर म्हणजे सुमारे ४० रुपये प्रतिकिलोच्या दराने जांभळांची विक्री होत आहे. जांभळामुळे शरीरातील वाढत असलेले मधुमेहाचे प्रमाण रोखण्यास मदत होते, असे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे. विशिष्ट ऋतूत आगमन होणाऱ्या जांभळाला अन्य फळांच्या तुलनेत लोक खाणे अधिक पसंत करतात. जांभळामुळे काही प्रमाणात रोजगार देखील मिळत आहे.