शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
5
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
6
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
7
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
8
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
9
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
10
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
11
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
12
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
14
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
15
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
16
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
17
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
18
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
19
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
20
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर

गतिमंद मुलीला केले आईवडिलांच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:21 AM

गतिमंद असलेली १५ वर्षाची मुलगी आई वडीलांच्या नजरेआड झाली. फिरता-फिरता गावापासून ३० कि. मी अंतरावर असलेल्या खमारी येथे पोहचली.

ठळक मुद्देपोलिसांची शोध मोहीम : सामाजिक कार्यकर्त्या बेदरकर यांनीही केली मदत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गतिमंद असलेली १५ वर्षाची मुलगी आई वडीलांच्या नजरेआड झाली. फिरता-फिरता गावापासून ३० कि. मी अंतरावर असलेल्या खमारी येथे पोहचली. ऐन तारूण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या या गतिमंद मुलीवर कुदृष्टी पडू नये, याची खबरदारी पोलिसांनी घेतली. सामजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांच्या मदतीने मुलीच्या आई-वडीलांचा शोध घेवून त्या मुलीला तिच्या आई-वडीलांच्या स्वाधीन केले.तिरोडा तालुक्याच्या काचेवानी येथील १५ वर्षाची गतिमंद मुलगी ५ एप्रिलला रात्री १०.३० वाजता गोंदिया तालुक्याच्या खमारी येथील बसस्थानकावर एकटीच दिसली. त्या निरागन मुलीवर कुदृष्टी पडू नये यासाठी व ती सुरक्षीत स्थळी पोहचावी म्हणून खमारीचे पोलीस पाटील चव्हाण यांनी पुढाकार घेऊन त्यांनी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार भीमराव आडे यांना फोन करून तीची माहिती दिली. ती बसस्थानकावर उभी असलेली मुलगी केवळ स्वत:चे नाव सांगते आई-वडीलांचेही नाव सांगू शकत नाही. गावाचा पत्ता तिला माहित नाही, असे सांगितल्यावर पोलीस हवालदार भीमराव आडे व महिला पोलीस शिपाई भाविका टेंभूर्णीकर हे दोघेही त्या मुलीला घेण्यासाठी खमारी बसस्थानकावर आले. तेथे त्यांना ती मुलगी मिळाली. तिला त्यांनी पोलीस ठाण्यात नेले. हॉटेलातून जेवण बोलावून तिला जेवन दिले. त्यानंतर तिला भाविका टेंभूर्णे यांच्या स्वाधीन केले. या कार्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सविता बेदरकर यांनी मदत घेतली. डॉ. बेदरकर यांनी त्या गतिमंद मुलीला चार-पाच ड्रेस दिले. ६ व ७ तारखेला सतत आजूबाजूच्या पोलीस ठाण्यात माहिती पाठविली. तिकडे या मुलीच्या वडीलांनी तिरोडा पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद केली. ती मुलगी गोंदिया ग्रामीण पोलिसांच्या हातात लागल्याने तिरोडा पोलिसांनी तिच्या आई वडीलांना माहिती देऊन गोंदियाला पाठविले. वडील फादअली हुसेन, आई मीनाद हुसेन, भाऊ आमिन हुसेन यांनी तिला ओळखले. त्यांनी गोंदिया ग्रामीण पोलिसांना बेपत्ता असल्याची रिपोर्ट दाखविली. आधारकार्ड दाखविले. त्यानंतर गोंदिया ग्रामीण पोलीसांनी कारवाई करून डॉ. सविता बेदरकर यांच्या समोर तिला आई वडीलांच्या स्वाधीन केले.तिच्या पालकांसाठी ३६ गावात फिरलेगतिमंद असलेल्या त्या मुलीला तिचे आईवडील मिळावे यासाठी सविता बेदरकर यांच्या सोबत गोंदिया ग्रामीण ठाण्याचे पोलीस गोंदिया व गोरेगाव तालुक्यातील ३६ गावात फिरले. सर्व पोलीस ठाण्यात माहिती दिली. व्हॉट्सअ‍ॅपच्या विविध ग्रुपवर माहिती टाकल्याने ती मुलगी काचेवानी येथील असल्याचा तिरोडा पोलीस ठाण्यातून फोन आला. परिणामी ती मुलगी आपल्या आई वडीलांना भेटली. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश शुक्ला यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार भीमराव आडे व महिला पोलीस शिपाई भाविका टेंभूर्णीकर यांनी बजरंगी भाईजानची भूमिका बजावली.