लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यात पावसासह गारपीट झाली. तर गोरेगाव येथेही हलका पाऊस बरसला. मात्र उर्वरीत तालुक्यांत पाऊस बरसला असून सर्वच उकाड्याने त्रस्त होते.जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांपासून उन्हासह ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. उन्ह व ढगाच्या या खेळात जिल्हा प्रशासनाकडून वादळी वाऱ्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यानुसार, जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यात शनिवारी (दि.२०) सायंकाळी पावसासह गारपीट झाली. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील महागाव, सिरोली व जाणवा परिसरात ही गारपीट झाल्याची माहिती आहे.शिवाय अन्य भागात हलका पाऊस बरसल्याची माहिती आहे. गोरेगाव येथेही हलका पाऊस बरसला असून गोंदिया शहरात फक्त शिंतोडे दिसले.पिकांचे नुकसानजिल्ह्यातील अन्य तालुक्यांत पाऊस बरसलेला नाही. जिल्ह्यातील अन्य भागात वातावरण उघडलेले होते व उकाडा होता. विशेष म्हणजे, या पावसामुळे कडधान्य व टरबूजचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यात गारपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 9:24 PM
जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यात पावसासह गारपीट झाली. तर गोरेगाव येथेही हलका पाऊस बरसला. मात्र उर्वरीत तालुक्यांत पाऊस बरसला असून सर्वच उकाड्याने त्रस्त होते.
ठळक मुद्देगोरेगावमध्ये हलका पाऊस । जिल्ह्यात अन्यत्र पाऊस नाही