शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

साडेचार हजार हेक्टरला गारपीट, वादळाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:17 PM

जिल्ह्यात मंगळवारी (दि.१३) झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीचा ४ हजार ३३० हेक्टरमधील पिकांना फटका बसला. यामुळे ३५१ गावातील १० हजार ७१८ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा कृषी विभागाने शासनाला पाठविला आहे.

ठळक मुद्दे३५१ गावे बाधित : १० हजारांवर शेतकऱ्यांचे नुकसान

ऑनलाईन लोकमतगोंदिया : जिल्ह्यात मंगळवारी (दि.१३) झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीचा ४ हजार ३३० हेक्टरमधील पिकांना फटका बसला. यामुळे ३५१ गावातील १० हजार ७१८ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा कृषी विभागाने शासनाला पाठविला आहे. गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शासन मदतीसाठी नेमके कोणते निकष लावून मदत जाहीर करते याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.मागील खरीप हंगामात कमी पाऊस आणि कीडरोगांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याची नुकसान भरपाई मिळायचीच असताना आता रब्बी पिकांना गारपीट व वादळी पावसाचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांची मेहनत आणि आशेवर पूर्णत: पाणी फेरल्या गेल्या. मंगळवारी झालेल्या गारपीट व वादळी पावसामुळे सुरूवातीला कृषी विभागाने ४०० हेक्टर मधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला होता. त्यानंतर कृषी आणि महसूल विभागाने नुकसानीचे सर्वेक्षण आणि पंचनामे केल्यानंतर तब्बल ४ हजार ३३० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याची बाब पुढे आले आहे. यात गहू, हरभरा, लाखोळी, भाजीपाला, धान या पिकांचे व आंबा, केळी, अ‍ॅपल बोर या फळबांगाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तब्बल २ हजार ८४१ हेक्टर मधील पिकांचे ३३ टक्केच्यावर तर १४८९ हेक्टर मधील पिकांचे ३३ टक्केच्या आत नुकसान झाले आहे. वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील ३५१ गावातील १० हजार ७१८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. गारपीट व वादळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील हरभरा, गहू व वटाण्याचे पीक भूईसपाट झाल्याने त्यांच्या हाती काहीच येणार नसल्याचे चित्र आहे. रब्बीतील पिके हातून गेल्याने शेतकऱ्यांसमोर केलेला लागवड खर्च आणि कर्जाची परतफेड कुठून करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.दरम्यान जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने नुकसानीचा अहवाल शासन व जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यामुळे शासन नुकसान भरपाईपासाठी कोणता निकष लावून मदत जाहीर करते याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.शेतकऱ्यांवर पुन्हा कर्जाचा डोंगरखरीप व रब्बीतील पीक हातून गेल्याने शेतकऱ्यांनी बँका आणि सावकारांकडून उचल केलेल्या कर्जाची परफेड कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा कर्जाच्या डोंगरखाली आल्याचे चित्र आहे.