शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

हाजरा फॉल होणार अधिक आकर्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2016 1:16 AM

तालुक्यातील नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हाजराफॉल धबधबा व त्यातील परिसर संपूर्ण महाराष्ट्रासह इतर प्रांतातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनणार आहे.

मुख्य वनसंरक्षकांची भेट : रोजगार निर्मितीसाठी वनविकासावर भर, वन्यजीवांची संख्याही वाढणारविजय मानकर सालेकसातालुक्यातील नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हाजराफॉल धबधबा व त्यातील परिसर संपूर्ण महाराष्ट्रासह इतर प्रांतातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनणार आहे. त्यासाठी आता वनविभागानेही पुढाकार घेत सकारात्मक पाऊल टाकणे सुरू केले आहे. मुख्य वनसंरक्षक टी.एस.के. रेड्डी यांनी रविवारी (दि.२८) सकाळी हाजराफॉल येथे भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हाजरा फॉल परिसरातील जंगलात आणि तेथील तळ्यात वनविभागाकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. हाजराफॉल परिसरात वन्यजीव संरक्षणाबद्दल रेड्डी म्हणाले की, येणाऱ्या वर्षात या परिसरात गवताळ मैदान तयार केले जातील, तसेच वनस्पती संवर्धन केले जाईल. त्यामुळे तृणभक्षी प्राणी या परिसरात मोठ्या प्रमाणात वावरतील आणि त्यांच्यावर आश्रित इतर मोठे प्राणीसुद्धा वाढतील. अशा प्रकारे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना धबधब्याच्या नैसगिक आनंद घेण्यासोबतच वन्यजीव प्राणी व पक्षी पाहण्यास मिळतील. त्यामुळे पर्यटकांचे आकर्षण याकडे वाढेल. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्यास सुद्धा मदत मिळेल. हाजराफॉल येथील तलावाचे खोलीकरण करुन पाणीसाठा वाढविण्यासाठी तलावाची क्षमता वाढविण्यात येईल व बोटिंगची सोय करण्यात येईल. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढेल व स्थानिक लोकांना रोजगार मिळण्यास मदत मिळेल असे वनसंरक्षक रेड्डी म्हणाले. मोठ्या प्रमाणावर होत असलेली वनाची कत्तल थांबविण्यासाठी विशेष करुन औषधीयुक्त वनाचे संरक्षण करण्यासाठी काय केले जाणार याबद्दल माहिती देताना रेड्डी म्हणाले, आपले भाग्य आहे की महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्याचे वित्तमंत्रीसुद्धा आहेत आणि ते या दिशेने विशेष प्रयत्न करीत आहेत. वनातून प्राप्त होणारे उत्पादन व त्यापासून तयार होणारे औषधीयुक्त पदार्थ निर्मिती व त्यासाठी बाजार उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. या दिशेने यश आल्यास वनाचे संरक्षण करण्यासाठी सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात सर्वांचे सहकार्य लाभेल. संयुक्त वन व्यवस्थापन समिती यासाठी विशेष उपयोगी ठरत आहे. टी.एस.के. रेड्डी यांची हाजराफॉलला झालेली भेट कुतूहलपूर्ण होती. त्यांनी हाजरा फॉल परिसरालगत विविध दऱ्याखोऱ्या, जंगल भ्रमण सुद्धा केले. शेजारी असलेला रेल्वे बोगदासुद्धा त्यांनी कुतुहलाने बघितला. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत गोंदिया जिल्ह्याचे उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, सहायक उपवनसंरक्षक यू.टी. बिसेन, योगेश वाघाये, नॅशनल एडवेंचर फाऊंडेशन नागपूरचे अविनाश देवशकर, सालेकसाचे वनपरिक्षेत्राधिकारी एस.जी. अवगान, क्षेत्रसहायक सी.जी. मडावी, पी.एस. मेंढे, आर.एस. भगत, एस.ए. घुंगे, आर.जी. जचपेले, सुरेश रहांगडाले, एफ.सी. शेंडे, जी.एफ. पटले तसेच वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदीन उईके व सर्व युवक युवत्या सहभागी झाल्या. याप्रसंगी हाजराफॉलकडे जाणारा प्रवेशद्वार, झारबिंग रोलर, वाटर बाल यांचे उद्घाटना करण्यात आले.झिप लाईनचे आकर्षण वाढणारमहाराष्ट्रात सर्वात मोठी अशी ५०० मिटर लांबीची झिप लाईन हाजराफॉल येथे लागणार आहे. त्या दिशेने काम सुरू झाले आहे. हे या ठिकाणचे विशेष आकर्षणाचे केंद्र राहणार आहे. या व्यतिरिक्त अनेक प्रकारच्या अ‍ॅडवेंचर स्पोटर््सवर भर देण्यासाठी विविध साहित्य लावले जात आहेत. येणाऱ्या दिवसात हाजराफॉलचा मोठा कायापालट होणार हे निश्चित. लोकसहभागातून वनांचे चांगले संरक्षणयावेळी लोकमतशी बोलताना रेड्डी म्हणाले, वन विभाग नेहमी वनांचा विकास आणि जणांचा विकास या आधारावर कामे करीत आहे. परंतु आता जणांचा विकास, मग वनाचा विकास असा प्रयोग सुद्धा करण्यात येत आहे. त्या दिशेने यशस्वी प्रयत्न केले जात आहेत. वनाची देखरेख करण्यासाठी तसेच वन क्षेत्रातील इतर सर्व पर्यटनस्थळ तसेच वन्य जीवाच्या संरक्षणाची पूर्ण जबाबदारी वनविभागावर देण्यात येत होती. त्यामुळे वनाचे संरक्षण हवे त्या प्रमाणात होताना दिसत नव्हते. परंतु सरकारने जेव्हापासून स्थानिक लोकांची सहभाग वाढवून मदत घेण्यास सुरुवात केली तेव्हापासून वनाचे संरक्षण करण्यात यश मिळत आहे.