शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
6
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
7
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
8
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
9
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
10
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
11
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
12
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
13
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
14
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
15
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
16
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
17
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
18
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
19
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
20
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 

एटीएममध्ये ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2017 12:47 AM

सालेकसा तालुक्यातील साखरीटोला (सातगाव) येथील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम केवळ शोभेची

साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील साखरीटोला (सातगाव) येथील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम केवळ शोभेची वस्तू बनली असून एटीएममध्ये पैशाचा ठणठणाट आहे. या एटीएममधून पैसे निघण्याऐवजी केवळ स्लीप बाहेर पडते. त्यामुळे एटीएम कार्डधारकांमध्ये कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे. नोटबंदीनंतर बराच कालावधी लोटूनही बँकेच्या ग्राहकांना मोठाच त्रास सहन करावा लागत असल्याने ‘अच्छे दिन’ या शासनाच्या घोषणेचा बट्याबोळ झाल्याचे चित्र दिसत आहे. मागील ९ नोव्हेंबरला केंद्र शासनाने पाचशे व एक हजाराचे नोट चलनातून बंद केले होते. तेव्हापासून बँकेमध्ये लोकांची गर्दी वाढली होती. त्याचा फटका ग्रामीण भागावरसुध्दा बसला होता. नोटबंदीमुळे अनेक लोकांचे आर्थिक व्यवहार बिघडले आहेत. आजही ग्राहकांना दहा हजाराच्या वर रक्कम मिळत नाही. तर बँक आॅफ महाराष्ट्र शाखा सातगाव येथे एका एटीएमची सुविधा असून एटीएमध्ये पैसे नसल्याने एटीएम कार्ड धारकांचे कार्ड कुचकामी ठरत आहेत. बँकेच्या व्यवस्थापकांना याबद्दल विचारणा केली असता बँकेत पैसे नसल्याचे सांगितले. एटीएममध्ये पैसे केव्हा टाकणार? ग्राहकांचा त्रास केव्हा कमी होणार? असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. (वार्ताहर)