उपस्थितीलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील मेडिकल कॉलेजच्या इमारतीसाठी सरकारने ४७० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र तीन चार वर्षांपासून इमारतीचे काम सुरू न झाल्याने मेडिकल कॉलेज केटीएस आणि बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या इमारतीत असल्याने रुग्ण आणि विद्यार्थ्यांची सुध्दा गैरसोय होत आहे. मात्र आता महाराष्ट्रात विकास आघाडीचे सरकार असून दोन वर्षांत मेडिकल कॉलेजच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन याच इमारतीतून कामकाज सुरू होईल व रुग्णांची सुध्दा गैरसोय होणार नाही अशी ग्वाही खा. प्रफुल्ल पटेल यांनी येथे दिली.गोंदिया शिक्षण संस्थेव्दारा स्व.मनोहरभाई पटेल यांच्या ११४ व्या जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक वितरण सोहळा रविवारी(दि.९) स्थानिक धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या प्रागंणावर आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट,महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,सिने कलावंत सुनील शेट्टी, नगराध्यक्ष अशोक इंगळे, आ. विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रिकापूरे, सहषराम कोरोटे,राजू कारेमोरे, प्रकाश गजभिये, माजी खा. मधूकर कुकडे, खुशाल बोपचे, माजी आ.सेवक वाघाये, माजी आ.हरिहरभाई पटेल, गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वर्षा पटेल, सचिव माजी आ.राजेंद्र जैन, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, नरेश माहेश्वरी उपस्थित होते. खा. प्रफुल्ल पटेल म्हणाले,मागील पाच वर्षात जिल्ह्याचा विकास खुंटला. मात्र आता रखडलेले सिंचन आणि इतर प्रकल्प सुध्दा मार्गी लावण्यात येतील. यासाठी पक्ष आणि मतभेद विसरुन एकत्र येऊन जिल्ह्याचा सर्वांगिन विकास करणार असल्याचे सांगितले. स्व.मनोहरभाई पटेल यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यात जी शिक्षणाची ज्योत प्रज्वलित केली ती सदैव तेवत राहील. दोन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आपले सदैव प्रयत्न राहिल. जिल्ह्यात उद्योग धंद्यांची स्थापन करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देऊ अशी ग्वाही पटेल यांनी दिली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, गोंदिया-भंडारा जिल्ह्यात तंत्रशिक्षणावर अधिक भर देण्याची गरज आहे. यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण बेरोजगारी दूर करण्यास मदत होईल.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार हे सर्वच क्षेत्रात चांगले काम करणार असून या दोन्ही जिल्ह्यातील सिंचनासह इतर सर्व प्रश्न सर्वजण एकत्र येऊन मार्गी लावू. मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील गोंदिया हे एक महत्त्वपूर्ण शहर असून येथील उद्योग धंद्यांना चालना देण्यासाठी जबलपूर रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले असून लवकरच या मार्गावरुन रेल्वे गाड्या सुरू होतील. यामुळे निश्चितच उद्योगाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीची अवस्था फारच बिकट आहे.त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नवीन वसाहत करण्यात यावे असे गृहमंत्री अनिल देशमुख यांना सांगितले. कार्यक्रमाचे संचालन माजी आ.राजेंद्र जैन, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केले.जिथे शिक्षण तिथेच आशा- आदित्य ठाकरेकुठल्याही देश किंवा राज्याची प्रगती खºया अर्थाने शिक्षणातूनच होते. त्यामुळे सर्वांचा भर शिक्षणावर असतो कारण जिथे शिक्षण असते तिथेच आशा असते.त्यामुळे विद्यार्थ्यांनो तुम्हाला गोंदिया शिक्षण संस्थेसारखी दर्जेदार शिक्षण संस्था मिळाली असून यातून चांगले ज्ञानार्जन करुन महाविद्यालय आणि जिल्ह्याचे नाव मोठे करा. खा. प्रफुल्ल पटेल यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला आपल्याला आमंत्रित केले हे भाग्य समजतो. आपल्याला कधी पदक मिळाले नाही मात्र पदक देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचे भाग्य मिळाले ही फार मोठी गोष्ट आहे. कारण पदक मिळणाºयापेक्षा पदक बहाल करण्याची संधी मिळणे ही फार मोठी गोष्ट असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले..महाविद्यालय पाहून भारावले मान्यवरगोंदिया शिक्षण संस्थेव्दारा संचालित मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्याल, मिल्ट्री स्कूल, धोटे बंधू विज्ञान आणि नमाद महाविद्यालयाचा परिसर पाहून राज्यस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सिने कलावंत सुनील शेट्टी हे अक्षरक्ष: भारावून गेले होते. त्यांनी ते बोलून सुध्दा दाखविले. गोंदिया सारख्या जिल्ह्यात अशा दर्जेदार शिक्षण संस्था आणि आंतरराष्ट्रीज दर्जासारखा कॅम्पसचा परिसर पाहून आपण खरोखरच गोंदियात आहोत का? असा भास झाला. स्व. मनोहरभाई पटेल यांनी शिक्षणरुपी लावलेल्या रोपट्याचे खा. प्रफुल्ल पटेल यांनी वटवृक्षात रुपांतर केले असून खरोखरच ही गौरवाची बाब असल्याचे सांगितले.नमस्कार गोंदियावासीयांनो.....प्रसिद्ध सिने कलावंत सुनील शेट्टी यांनी मराठीतून भाषणाला सुरूवात करीत नमस्कार गोदियावासीयांनो कसे आहात बरे,आहात ना असे विचारीत आपल्या भाषणाला सुरूवात केली. मला मराठी चांगली येते पण मी गर्दीसमोर गेलो की थोडा घाबरतो असे सांगितले. या वेळी त्यांनी धडकन चित्रपटातील एक डॉयलॉग सादर केला. प्रफुल्ल पटेलजी मै तुम्हे भूल जाऊ एैसा हो नही सकता और तुम मुझे भूल जाओ ये हो नही सकता असे सांगत मेडिकल कॉलेजच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नक्कीच तिथे चहा पिण्यासाठी येण्याची ग्वाही सुनील शेट्टी यांनी दिली.
या गुणवंत विद्यार्थ्यांचा सुवर्ण पदक देऊन गौरवदहावीच्या परीक्षेत प्रथम क्र मांक पटकाविणाऱ्या आदित्य राजू राहुलकर, मुलींमध्ये कल्याणी प्रभू सोनवाने, इयत्ता बारावीच्या परीक्षेत प्रथम क्र मांक प्राप्त सीया धमेंद्र ठाकुर, बीएमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त अर्चना रविंद्र राऊत, बीकॉमचा अक्षयकुमार सदाशिव शिवणकर, बीएससीमध्ये प्रथम मेघा रमेश अग्रवाल, अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रथम सोनिया महेंद्र लांजेवार, भंडारा जिल्ह्यातील दहावीच्या परीक्षेतील प्रथम प्रतीक्षा प्रमोद बेदपुरीया, बारावीत प्रथम खुशी संतोष गंगवानी,बीएमध्ये प्रथम सश्रृप्ती गुणवंत काळबांधे,बीकॉमची पायल चोपडे, बीएससीमधील प्रथम समिक्षा बोरघरे,अभियांत्रिकी अभ्यासक्र मात प्रथम मनिषा श्यामराव भदाडे या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गोंदिया शिक्षण संस्थेचे मुन्ना राणा यांना सुवर्ण पदक देऊन गौरविन्यात आले.