लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वस्ती शाळेच्या मुख्याध्यापिकेचा कुऱ्हाडीने घाव घालून पतीने शाळेतच खून केला. ही घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान तालुक्याच्या इर्री येथे घडली.प्रतिभा दिलीप डोंगरे (५१) असे खून झालेल्या मुख्याध्यापिकेचे नाव आहे. तर दिलीप डोंगरे असे आरोपी पतीचे नाव आहे. घरगुती वादातून त्याने खून केल्याची माहिती आहे.नेहमीप्रमाणे मुख्याध्यापिका डोंगरे या शाळेत गेल्या. प्रार्थना झाल्यानंतर विद्यार्थी आपापल्या वर्गात गेले. यानंतर दिलीप डोंगरे शाळेत आला. तेव्हा एका वर्गात शिक्षिका रंगारी तर दुसऱ्या वर्गात मुख्याध्यापिका डोंगरे विद्यार्थ्यांना शिकवित होत्या. त्यावेळी आरोपी डोंगरे त्यांच्या वर्गात गेला. त्याने विद्यार्थ्यांच्या समोरच प्रतिभा डोंगरे यांना ओढत शाळेच्या ग्राऊंडमध्ये आणले. यामुळे शाळेत गोंधळ उडाला. आजूबाजूचे लोक हा थरार पाहून गोळा झाले. त्याने प्रतिभाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून तिच्यावर कुऱ्हाडीने अनेक वार केले. गळ्यावर, मानेवर, पाठीवर असे वार करून त्यांना जागीच ठार केले. यानंतर घटनास्थळावरून त्याने पळ काढला.दिलीप आणि प्रतिभा यांच्यात मागील तीन चार वर्षांपासून वाद होत असायचा. इर्री येथे राहणार नाही असा पवित्रा प्रतिभाचा असल्यामुळे मागील तीन वर्षापासून दोघेही दत्तोरा येथे भाड्याने घर घेऊन राहात होते. परंतु चार महिन्यापूर्वी त्यांच्यात पुन्हा वाद झाल्याने दिलीप खोली सोडून इर्री येथे आला. प्रतिभा दोन मुलींना घेऊन दत्तोरा येथे राहात होत्या. त्या ठिकाणाहून त्या इर्री येथे शिकवायला येत होत्या. इर्री येथे आलेल्या दिलीपला स्वयंपाक करायला कुणी नसल्यामुळे त्याने नागपूरला भावाकडे राहात असलेल्या आपल्या आईला इर्री येथे आणले होते. चार दिवसांपूर्वी त्याने आपल्या आईला नागपूर येथे सोडून दिले.चारित्र्यावर संशयमृत प्रतिभावर तो चारित्र्याचा संशय घेऊन नेहमी तिच्याशी वाद घालायचा. तीन-चार महिन्यापूर्वी झालेल्या वादाचे हेच कारण असल्यामुळे तो त्यांना सोडून इर्रीला आला होता. एकांगी जीवन जगणे व्यर्थ वाटत असावे म्हणून त्याने प्रतिभालाच ठार केले.
दिलीपच्या विरोधात महिला आयोगात तक्रारदिलीप आपला वारंवार छळ करीत असल्यामुळे प्रतिभाने त्याची तक्रार महिला आयोगाकडे केली होती, असे बोलल्या जाते. यासंदर्भात त्याची पहिली पेशी सुध्दा झाली होती. पती पत्नीच्या वादात दोन मुलींच्या डोक्यावरील पालकांचे छत्र हरपले आहे.गोंदियात अर्जनवीस म्हणून काम करणाºया दिलीप डोंगरेच्या या कृत्यामुळे समाजमन ढवळून निघाले.