गोरेगाव : शासनाच्या आरोग्यविषयक अनेक योजना आहेत. परंतु योजनांचा लाभ गरजू ग्रामस्थांपर्यंत पोहोचत नाही. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागात गरजूंना आरोग्यविषयक योजनांचा लाभ मिळतो, असे प्रतिपादन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले.स्व. रविंद्र अजतलाल भगत यांच्या २४ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून नवसंजीवनी बहुउद्देशिय संस्था गोरेगावच्या वतीने कुऱ्हाडी येथील रामकृष्ण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आरोग्य शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.उद्घाटन विनोद अग्रवाल यांच्या हस्ते, जि.प. आरोग्य व शिक्षक सभापती पी.जी. कटरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने किरसान मिशन शिक्षण संस्थेचे संचालक डॉ.एन.डी. किरसान, विजय राणे, सरपंच संजय आमदे, सुनील केलनका, प्राचार्य सविता बेदरकर, बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष मुकेश देव्हारे, सचिव श्रद्धा देव्हारे, संचालिका दिव्या भगत, प्राचार्य डी.एम. राऊत, वनविभाग पतसंस्थेच्या संचालिका कस्तुरा भगत, सुधाकर देव्हारे, डॉ.मीना वट्टी, डॉ. शुक्ला उपस्थित होते.देवी सरस्वती व स्व. रविंद्र भगत यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून शिबिराला सुरूवात झाली. अध्यक्षीय भाषणात पी.जी. कटरे यांनी आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती दिली. विजय राणे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना सामाजिक क्षेत्रात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. सदर शिबिरात २०० रूग्णांची तपासणी व नि:शुल्क आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रास्ताविक प्राचार्य डी.एम. राऊत यांनी मांडले. संचालन प्रा. राम भेलावे यांनी केले. आभार दिव्या भगत यांनी मानले. शिबिरासाठी प्रदीप येडे, आनंद देशमुख, विशाल भस्मे, दर्पन वानखेडे, लकी भोयर, घनश्याम बिसेन व ग्रामस्थांनी सहकार्य केले.
गरजुंच्या मदतीसाठी आरोग्य शिबिरे महत्त्वाची- अग्रवाल
By admin | Published: July 07, 2016 1:57 AM