लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : पंचायत समिती अंतर्गत येणाºया ग्राम सितेपार येथे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी गुडमॉर्निंग पथकासह भेट दिली. ग्रामस्थांनी आपले आरोग्य कसे जपावे तसेच सामाजिक आरोग्यासाठी शौचालयाची गरज यावर सुसंवाद साधला व त्यांना शौचालय बांधकामासाठी प्रेरित केले.गुडमॉर्निंग पथकात मुकाअ ठाकरे यांच्यासह प्रामुख्याने जि.प. सदस्य सुरेश हर्षे व गट विकास अधिकारी पांडे सहभागी झाले होते. त्यांनी सामाजिक आपुुलकी जपून ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य कसे चांगले ठेवता येईल, शौचालय नसणाºया कुटुंबांना आरोग्याविषयी समजावून शौचालय बांधकामासाठी मार्गदर्शन केले.या वेळी सितेपारच्या काही कुटुंबांनी त्यांच्यासमोरच शौचालयासाठी खोदकाम करुन प्रामाणिकतेचे उदाहरण सादर केले. मुकाअ ठाकरे यांनी ४ तुकड्या तयार केल्या. गावामध्ये जिथे-जिथे खुल्या जागेवर शौचास बसणाºया उपयुक्त स्थळी प्रस्थान केले. परंतु उघड्यावर शौच करणारे आढळले नाही.गावामध्ये मिनी साऊंड सिस्टमद्वारे फिरणाºया फेरीने नागरिकांना महत्व सांगितले. यावर शौचालय बांधकामाची नागरिकांनी ग्वाही दिली. तसेच बांधकाम पूर्ण होईपर्यंत नातलगांच्या घरी जाणार नाही, अशी ग्वाही दिली.चारही तुकड्यांची गावात फेरी संपताच ग्रामपंचायत कार्यालयात सर्व अधिकारी-कर्मचारी एकत्र आले. मुकाअ ठाकरे यांनी धानाच्या शेतावर लागलेले मावा, तुळतुळा रोगांच्या प्रादुर्भावावर मात करण्याचे उपाय सांगितले. त्याचप्रमाणे जि.प. सदस्य हर्षे यांनी, शौचालय बांधकाम अधिक कसे करता येईल व जीएसटीमुळे शौचालय बांधकाम मंदावले असल्यामुळे त्यावर पर्यायी उपाय सांगितले. दुष्काळी परिस्थितीला बघून मग्रारोहयोची कामे कसे त्वरित सुरु करता येतील, यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपसरपंच देवराम बिसेन, विनोद चुटे, पी.एन. मानकर, एल.एन. कुटे, के.पी. बन्सोड, आर.एस. मेंढे, गौर, हौसलाल चौधरी, अंगणवाडी सेविका व गावकरी उपस्थित होते.ग्रामसेवकाने मारली दांडीसदर गुडमॉर्निंग पथकाला ग्रामपंचायत सचिवांनी अनुपस्थित राहून दांडी मारली. ही बाब प्रशासनासाठी चिंतेचा विषय आहे. काहीही कारण नसताना सचिवाचे एवढे धाडस कसे, हा ग्रामस्थांसाठी चिंतेचा व अधिकाºयांना न पचणारा विषय ठरला. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, गटविकास अधिकारी आदी स्वत: पहाटे ५ वाजता गावामध्ये हजर झाले. परंतु सचिवच गैरहजर, याला कारण काय? अशी विचारणा जिल्हा परिषद सदस्य हर्षे व ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांना केली. यावर अशा कर्मचाºयांवर आपण निश्चितच कारवाई करणार, असे आश्वासन त्यांनी दिले.
ग्रामस्थांशी आरोग्यावर संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 9:19 PM
पंचायत समिती अंतर्गत येणाºया ग्राम सितेपार येथे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी गुडमॉर्निंग पथकासह भेट दिली.
ठळक मुद्देगुडमॉर्निंग पथक : शौचालय बांधकामासाठी केले प्रेरित, त्वरित खोदकाम सुरू