लोकमत न्यूज नेटवर्ककाचेवानी : बरबसपुरा येथे सरपंच ममता लिचडे व नवनिर्वाचित सरपंच नरेश असाटी यांच्या विनंतीवरुन अदानी फाऊंडेशनने गावात स्वच्छता अभियान राबविले. स्वच्छता अभियानात गावकºयांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून आरोग्याचा संदेश दिला.संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत अदानी फाऊंडेशन आणि ग्रा.पं.च्यावतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानप्रसंगी अहमदाबादच्या अदानी पॉवरच्या मुख्य कार्यालयातील रॉयचौधरी, अदानी प्रकल्प प्रमुख सी.पी. शाहू, अदानी फाऊंडेशनचे नितीन शिवणकर, प्रसाद यांच्यासह ३० ते ४० अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. सरपंच ममता लिचडे, सदस्य व नवनिर्वाचित सरपंच नरेश असाटी, ममता पटले, उषा पटले, रत्नमाला शेंदरे, वीणा कटरे, प्रमिला कोसरे, रितेश पंधरे, गोपाल नेवारे, अंगणवाडी सेविका रहांगडाले, प्रेरक डोंगरे व पारधी, शिक्षक बघेले तसेच विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.स्वच्छता अभियानासंबंधी साहित्य अदानी फाऊंडेशनने पुरविले. अदानीचे अधिकारी-कर्मचारी, ग्रा.पं. पदाधिकारी, शाळेतील मुले-मुली आणि गावाच्या काही महिला-पुरुषांनी झाडू हातात घेवून गावातील संपूर्ण रस्ते आणि चौक तसेच संपूर्ण गावातील परिसर स्वच्छ केला. स्वच्छता केल्यानंतर सर्वजण एकत्र गोळा झाले. उपस्थितांना अदानी पॉवरचे सी.पी. शाहू, नितीन शिरोळकर यांच्यासह काही मान्यवरांनी नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. स्वच्छतेमुळे ८० टक्के रोगांवर नियंत्रण मिळवू शकतो, असेही सांगण्यात आले.यावेळी तिरोडा पं.स.चे बीडीओ जादेव इनामदार यांनी याच दिवशी विलंबाने गावाला भेट दिली. त्यांना स्वच्छता अभियान राबवित असल्याची माहिती नव्हती. नंतर माहिती झाल्यावर ग्रामपंचायतमध्ये उपस्थिती दर्शवून माहिती जाणून घेतली. या वेळी सरपंच ममता लिचडे, सदस्य व नवनिर्वाचित सरपंच नरेश असाटी तसेच सदस्य उषा पटले, प्रमिला कोसरे, रत्नमाला शेंदरे उपस्थित होत्या. जावेद इनामदार यांनी गावाच्या विकासासंबंधी चर्चा करुन समाधान व्यक्त केले. गावाला शिक्षित व अनुभवी सरपंच लाभल्याबद्दल प्रशंसा केली. तसेच अदानी प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येकवेळी सहकार्य करण्याचे आश्वासन नवनिर्वाचित सरपंच नरेश असाटी यांना दिले.रॉय चौधरीसोबत सरपंचाची चर्चाअहमदाबाद येथील कार्यालयाचे अधिकारी रॉय चौधरी यांच्याशी सरपंच ममता लिचडे आणि नवनिर्वाचित सरपंच नरेश असाटी यांनी गाव व अदानीच्या सहकार्यासंबंधी चर्चा केली. गावाला लागणाºया गरजांची पूर्ती अदानी पॉवरने करावी. यावेळी गावात विविध विकासात्मक कामे करण्यासंदर्भात अदानी प्रकल्पाच्या अधिकाºयांसह चर्चा करण्यात आली. यात सकारात्मक चर्चा झाली.गावाला पाणी शुद्धीकरण यंत्र देणारबरबसपुरा येथील नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे याकरिता अदानी फाऊंडेशन लवकरच आरोची सुविधा करुन देईल, असे अदानी फाऊंडेशनने स्पष्ट केले. मात्र त्यासाठी लागणाºया खोलीची व्यवस्था नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे ग्रा.पं. पदाधिकारी आणि नागरिकांनी यावर तोडगा काढण्याची मागणी केली.आरओचा योग्य उपयोग होणार का?गावात अदानीने आरोची व्यवस्था करुन दिली तरी त्याकरिता लागणारी स्वतंत्र इमारत नाही. विद्युत खर्च व इतर साहित्य पुरविण्याची व्यवस्था नाही. अर्थात ग्रा.पं. ला खर्चिक स्वरुपाची योजना आहे. गावातील नागरिक परिस्थितीने साधन नसले तरी सर्वांच्या घरी फिल्टर आहेत. नसले तरी त्यांना पाणी खरेदी करुन घेण्याची पाळी येत नसल्याने आरोचा योग्य उपयोग होणार का असा सवाल उपस्थित केला.
स्वच्छतेतून आरोग्याचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 9:48 PM
बरबसपुरा येथे सरपंच ममता लिचडे व नवनिर्वाचित सरपंच नरेश असाटी यांच्या विनंतीवरुन अदानी फाऊंडेशनने गावात स्वच्छता अभियान राबविले.
ठळक मुद्देबरबसपुरा येथे स्वच्छता अभियान : ग्रामपंचायत व अदानी फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम