गौण खनिज चोरीकडे दुर्लक्ष!
सडक-अर्जुनी : महसूल आणि वनविभागाच्या हद्दीतील गौण खनिजांची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे; परंतु महसूल विभाग केवळ रेती तस्करांच्या मागावर असतात.
डासांच्या प्रादुर्भावाने गावकरी त्रस्त
तिरोडा : डासांची उत्पत्ती होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने डासांची संख्या वाढली आहे. याचा परिणाम जनतेच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे डासांचे निर्मूलन करणे गरजेचे आहे.
प्रसाधनगृहाअभावी व्यापाऱ्यांची कुचंबणा
गोंदिया : व्यापारी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या मोठ्या बाजारात प्रसाधनगृहाची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे ग्राहक, व्यापाऱ्यांची मोठी कुचंबणा होत आहे.
प्रदूषण रोखण्यास मंडळाचे दुर्लक्ष
आमगाव : वाहनांना कर्णकर्कश प्रेशर हॉर्न लावण्यासाठी आणि भररस्त्यावर वाजविण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. प्रेशर हॉर्न वापरणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई होत नाही.
जंतुनाशक फवारणी करण्याची मागणी
आमगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी आमगाव नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या आठ गावांत जंतुनाशकाची फवारणी करावी, अशी मागणी काँग्रेस ओबीसी विभागाचे तालुका उपाध्यक्ष विजय बहेकार यांनी केली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग तालुक्यात झपाट्याने वाढत असून, रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कित्येकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक पसरू नये, याकरिता नगर परिषद प्रशासनाने शहरासह ग्रामीण भागात जंतुनाशक फवारणी करावी, अशी मागणी विजय बहेकार यांनी केली आहे.
तिरोड्याचे गटविकास अधिकारी लिल्हारे
तिरोडा : मागील दीड वर्षापासून तिरोडा पंचायत समितीला स्थायी गटविकास अधिकारी नव्हते. यानंतर प्रशासनाने नुकतेच गटविकास अधिकारी पदाचा कार्यभार सतीश लिल्हारे यांच्याकडे सोपविण्याचे आदेश दिले. यानंतर नुकताच त्यांनी गटविकास अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
पांढरी येथे स्वच्छता अभियान
पांढरी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथे दुर्वास भेलावे यांच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. बाजार चौक पांढरी, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा परिसर, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती कार्यालय परिसर, अंगणवाडी परिसर, समूह साधन केंद्र परिसरात हे अभियान राबविण्यात आले.
कोविड सेंटरची आमदारांकडून पाहणी
आमगाव : येथील कोविड केअर सेंटरला आमदार सहषराम कोरोटे यांनी भेट देऊन पाहणी केली. याशिवाय त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील व्हॅक्सिनेशन सेंटरलासुद्धा भेट दिली. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत जास्तीतजास्त लस उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. या वेळी डॉ. शील घडले, डॉ. मोनाली उपराडे, डॉ. भावना खांबलकर, डॉ. ताम्रध्वज नागपुरे, डॉ. राजेश रहांगडाले, रेखा गाढवे, वंदना पिघोडे, हेमा शिवणकर, संजय बहेकार, अजय खेतान, महेश उके, तारेंद्र रामटेके उपस्थित होते.
विद्युत ट्रान्सफाॅर्मर लावण्याची मागणी
पांढरी : सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी परिसरातील ग्राम डुंडा गावातील विद्युत ट्रान्सफाॅर्मरमधून दोन ते तीन दिवसांपासून कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत आहे. तर विद्युत पुरवठा वांरवार खंडितही होत आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.
भटक्या समाजाची समस्या संपता संपेना
आमगाव : पोटाची खळगी भरण्यासाठी ‘विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर’ या म्हणीप्रमाणे लोहार समाज भटकंती करून आपल्या संसाराचा गाडा हाकत आहे.