मजुरी वाढल्याने शेतकरी अडचणीत
गोरेगाव : जिल्ह्यात सध्या धान कापणी व मळणीला जोर आला आहे. त्यामुळे शेतकरी मजुरांच्या शोधात आहे. मात्र, मजुरी वाढविण्यात आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
बेरोजगारांच्या हाताला काम द्या
अर्जुनी-मोरगाव : तालुक्यात मोठ्या उद्योगाचा पत्ता नाही. त्यामुळे तालुक्यात बेरोजगारांची संख्या वाढत असून, स्थानिक युवकांना रोजगारांसाठी भटकंती करावी लागत आहे.
उभ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता
देवरी : रस्त्याकडेला वाहने उभी राहत असल्याने अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अतिक्रमणांची समस्या वाढली आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
सुरक्षा कवचाविना डीपी धोकादायक
खातिया : तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. विद्युत प्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. त्यामुळे धोका होऊ शकतो.
ग्रामीण भागात भुरट्या चोऱ्यांत वाढ
अर्जुनी-मोरगाव : ग्रामीण भागात भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. काही गावांत चोरटे भरदिवसा शिरून चोरी करीत आहेत. अनेक ठिकाणी दुकाने, पानटपऱ्या, हॉटेल फोडून साहित्य लंपास केले जात आहे. पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.
मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी
आमगाव : स्थानिक परिसरातील शेतशिवारात अनेक मोकाट कुत्री असून, ही कुत्री एकटी महिला किंवा पुरुष पाहून हल्ला करतात. पाळीव जनावरांनाही ते जखमी करीत आहेत. अशा अनेक घटना शिवारात घडल्या असल्याने शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
जिल्ह्यात कृषिपंप चोरटे झाले सक्रिय
खातिया : सिंचनासाठी विहीर, नदीनाल्यावर लावलेले कृषिपंप चोरीस जाण्याच्या घटनांत जिल्ह्यात वाढ झाली आहे. दररोज कुठे ना कुठे चोरीची घटना घडत असून, एखादी टोळी जिल्ह्यात सक्रिय असावी, अशी शंका निर्माण झाली आहे. तक्रारीसाठी गेल्यानंतर तक्रार नोंदविण्यासाठी नानाविध प्रश्न केले जातात.
बैलबाजारांना उतरती कळा
खातिया : एकेकाळी प्रसिद्ध असलेला जिल्ह्यातील बैलबाजार सध्या आपले मोल हरवून बसल्याचे दिसत आहेत. भंडारा, कोंढा (कोसरा), अड्याळ, मासळ, लाखनी, लाखांदूर आदी ठिकाणी गेल्या काही वर्षांपर्यंत मोठे बैलबाजार भरत असत. आता ती परिस्थिती राहिली नाही.
किसान सन्मान योजनेपासून वंचित
गोंदिया : सरकारने कोरोना संकटकाळात दिलासा मिळावा, यासाठी किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला. या योजनेतून अनेक लाभ मिळाले. वारंवार शासकीय उंबरठे झिजवावे लागतात.
अभयारण्यामुळे शेतजमिनी ओसाड
गोंदिया : जल, जंगल, जमीन, प्राणी यांचे संवर्धन करताना व्याघ्र प्रकल्प, अभयारण्याची निर्मिती आवश्यक असली, तरी मानवी हिताचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. उमरेड-पवनी-कऱ्हांडला असलेल्या शेतजमिनीचे अधिग्रहण अद्याप झाले नाही.
रोजगार सेवकांना मानधन अत्यल्प
गोंदिया : लोकांच्या हाताला काम द्यावे म्हणून मनरेगांतर्गत काम उपलब्ध करून देण्यात रोजगार सेवकांची जबाबदारी आहे. पण त्यांना अल्प मानधनावर काम करावे लागत आहे. त्यांच्या मानधनात वाढ व्हावी, अशी मागणी होत आहे.