ऑनलाईन लोकमतसालेकसा : दोन दिवसांपूर्वी गिरोला येथील पुस्तकला पंधरे या विधवा महिलेच्या घराला अचानक लागलेल्या आगीमुळे घरातील सर्वच वस्तू भस्मसात झाले. त्यांच्या अंगावरील दोन कपड्यांशिवाय काही उरले नाही. ही घटना माहीत होताच लोकमत प्रतिनिधीने घटनास्थळ गाठून प्रत्यक्ष चौकशी केली व लोकमतला बातमी प्रकाशित केली.दुसºया दिवशी लगेच लोकमतला बातमी झडकताच अनेकांचे मन द्रवित झाले. गोंदिया येथील समाजसेविका सविता बेदरकर यांनी बातमी वाचल्यावर त्या महिलेच्या कुटंबाला मदत करण्याचा संकल्प केला आणि यासाठी काही लोकांशी संपर्क करुन मदतीसाठी सहकार्य मागले.माविम ग्राम विकास संस्था सालेकसाच्या वतीने १० हजार रुपयांची मदत करण्यात आली. तसेच आमगाव क्षेत्राचे आ. संजय पुराम यांनी दोन हजार ५०० रुपयांची मदत केली. माजी जि.प. सभापती सविता पुराम यांनी साडी आणि शाल भेट केली. तसेच आ. गोपालदास अग्रवाल, चेतन बजाज, लक्ष्मी आंबेडारे, नानन बिसेन, अर्चना कटरे, माजी जि.प. सभापती देवराज वडगाये, समाज सेविका सविता बेदरकर यांच्याकडून एकंदरित चार हजार ६०० रुपये रोख आणि भांडी, कपडे व इतर जीवनोपयोगी वस्तू देण्यात आल्या.मंगळवारी, ६ जानेवारीला सकाळी सविता पुराम, सविता बेदरकर, अनिल सोसे आणि देवराज वडगाये आदींनी पीडित पुस्तकलाचे घर गाठले. पुस्तकला आपल्या मुलासह जळालेल्या घराची दुरुस्ती करीत असतानाच त्यांच्या घरी जाऊन विधवा पुस्तकलाशी संवाद साधला. नंतर सांत्वना देत धैर्य राखण्याचे धाडस वाढविले आणि भेटवस्तू व रोख रकमेची मदत केली. बातमी प्रकाशित केल्याबद्दल कुटुंबीयांनी व गावकºयांनी लोकमतचे आभार मानले.
‘त्या’ पीडित कुटुंबाला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 11:56 PM
दोन दिवसांपूर्वी गिरोला येथील पुस्तकला पंधरे या विधवा महिलेच्या घराला अचानक लागलेल्या आगीमुळे घरातील सर्वच वस्तू भस्मसात झाले. त्यांच्या अंगावरील दोन कपड्यांशिवाय काही उरले नाही.
ठळक मुद्देगिरोला येथील पुस्तकला पंधरे या विधवा महिलेच्या घराला अचानक लागलेल्या आगीमुळे घरातील सर्वच वस्तू भस्मसात