शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

नीलक्र ांतीतून जीवनमान उंचावण्यास मदत

By admin | Published: July 02, 2017 12:24 AM

जिल्ह्यातील ढिवर व भोई समाज बांधवांची ३०० वर्षाची मासेमारीची परंपरा आहे. पारंपरीक पद्धतीने ते आजही मासेमारी करतात.

 अनुप कुमार : ‘तलाव तेथे मासोळी’ अभियान कार्यशाळा लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यातील ढिवर व भोई समाज बांधवांची ३०० वर्षाची मासेमारीची परंपरा आहे. पारंपरीक पद्धतीने ते आजही मासेमारी करतात. आज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करु न मत्स्योत्पादन घेण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक गावाशेजारी असलेल्या तलावातून मोठ्या प्रमाणात मत्स्योत्पादन घेतल्यास निलक्र ांतीला दिशा मिळेल आणि मासेमारी करणाऱ्या बांधवांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी केले. शुक्रवारी (दि.३०) येथील जिल्हा परिषद, मत्स्य विभाग आणि अदानी फाउंडेशन यांच्या संयुक्तवतीने अदानी प्रकल्पातील सभागृहात आयोजित तलाव तेथे मासोळी कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यशाळेचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, अदानी प्रकल्पाचे प्रमुख सी.पी.साहू, पं.स.सभापती उषा किंदरले, जि.प.सदस्य राजलक्ष्मी तुरकर, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रभारी प्रादेशिक उपायुक्त समीर परवेज उपस्थित होते. पुढे बोलताना अनूप कुमार यांनी, या अभियानामुळे शेतीपुरक व्यवसायाला चालना मिळेल. गोड्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात मत्स्योत्पादनासाठी होणार आहे. तलाव तेथे मासोळी या अभियानामुळे कुटूंबाचे दरडोई उत्पन्न वाढविण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यात असलेल्या तलावांचा जास्तीत जास्त वापर मत्स्योत्पादनासाठी करण्यात यावा. माशांचा आहार केल्यास त्यामधून मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स मिळते. प्रोटिन्समुळे मेंदूचा विकास होतो. संतुलीत आहारासाठी प्रोटीन्स आवश्यक आहे. मागास व आदिवासी भागात तलाव बोड्यांमधून मासोळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेवून व आहारात त्याचा वापर करु न प्रोटीन्सची कमतरता भरु न काढता येईल. त्यामुळे कुपोषण टाळण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले. मेंढे यांनी, आपला जिल्हा हा तलावांचा जिल्हा आहे. मत्स्यव्यवसायाच्या स्पर्धेत जिल्हा अग्रभागी आहे. मासेमार बांधव तलाव ठेक्याने घेवून मासेमारीवर आपली उपजिविका करतात. हा व्यवसाय पुढे गेला पाहिजे, मत्स्य उत्पादन मोठ्या प्रमाणात करु न इतर राज्यात व देशात त्याची निर्यात झाली पाहिजे. मत्स्य सहकारी संस्थांना तलाव हे मत्स्य व्यवसायासाठी मिळाले पाहिजे. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. ठाकरे यांनी, जिल्ह्यातील मासेमार बांधवांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी ‘तलाव तेथे मासोळी’ अभियान उपयुक्त ठरणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून मासेमार बांधवांना सक्र ीय पाठबळ उत्पादन वाढीसाठी मिळत आहे. दहा मिहन्यानंतर जिल्ह्यात मत्स्य क्षेत्रात वेगळे चित्र दिसेल असे त्यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रभारी प्रादेशिक उपायुक्त परवेज यांनी मांडले. संचालन सविता तिडके यांनी केले. आभार अदानी फाउंडेशनचे प्रमुख नितीन शिराळकर यांनी मानले. कार्यशाळेला जिल्हा उपनिबंधक संदिप जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी मृणालिनी भूत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पथाडे, उपजिल्हाधिकारी आर.टी.शिंदे, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, गंगाराम तळपाडे, वर्षा लांडगे, तहसीलदार संजय रामटेके, उपविभागीय कृषी अधिकारी नंदिकशोर नाईनवाड, तालुका कृषी अधिकारी प्रदिप पोटदुखे, मत्स्यविकास अधिकारी सलामे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाचे जिल्हा समन्वयक मुंजे, जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, विविध मत्स्य सहकारी संस्थांचे पदाधिकारी, मत्स्य सखी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. अभियानाचे सादरीकरण व ट्रेनर्सचा सत्कार कार्यशाळेत विभागीय आयुक्त यांनी ‘तलाव तेथे मासोळी’ अभियानाबद्दल सादरीकरण केले. सादरीकरणातून अभियानाचे उद्दिष्ट, गोड्या पाण्यातील मत्स्यशेती, तलावांची उत्पादकता, मत्स्य आहार सकस आहार याविषयी विस्तृत माहिती उपस्थितांना दिली. तसेच या अभियानाअंतर्गत २३ ते २४ जून दरम्यान नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील थडीपवनी येथे नितीन गडकरी कृषी व कौशल्य विकास केंद्रात प्रशिक्षण घेतलेल्या मत्स्य सहकारी संस्थांचे पदाधिकारी, मत्स्य सखी, समुदाय मत्स्य व्यवस्थापक या मास्टर्स ट्रेनर्सला मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.