शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

गरजूंना जरुर मदत करा पण जवळच्यांचा विसर नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 5:00 AM

देश आणि राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे हा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठीच देशाभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर नागरिकांनी या कालावधी घराबाहेर पडू नये, यासाठी संचारबंदी व जमावबंदीसारखे कायदे लागू करण्यात आले आहे.लॉकडाऊनमुळे उद्योग धंदे बंद पडल्याने रोजगारासाठी बाहेरील राज्य आणि जिल्ह्यात गेलेले मजूर आपल्या कुटुंबासह आता आपल्या गावाकडे परतत आहेत.

ठळक मुद्देत्यांनाही द्या मदतीचा हात : अभय सावंत यांनी ठेवला आदर्श, इतरांनी घ्यावा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. तर गरजूंच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहे. मात्र ही मदत करताना जवळच्यांच काहींना विसर पडत आहे. गरजूंना मदत जरूर करा पण आपल्या घरी, दुकानात, आपला व्यवसाय वाढविण्यात ज्यांची मोलाची भूमिका बजावली अशा जवळच्या गरजू माणसांचा विसर मात्र पडू न देता त्यांनाही प्राधान्याने मदत करा, हाच मुलमंत्र जपण्याचा महत्त्वपूर्ण संदेश गोंदिया येथील एका व्यावसायिकांने दिला आहे.देश आणि राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे हा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठीच देशाभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर नागरिकांनी या कालावधी घराबाहेर पडू नये, यासाठी संचारबंदी व जमावबंदीसारखे कायदे लागू करण्यात आले आहे.लॉकडाऊनमुळे उद्योग धंदे बंद पडल्याने रोजगारासाठी बाहेरील राज्य आणि जिल्ह्यात गेलेले मजूर आपल्या कुटुंबासह आता आपल्या गावाकडे परतत आहेत. मात्र त्यांचा रोजगार बुडाला असल्याने त्यांच्या समोर दोन वेळेच्या जेवनाचा आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा गरजूंच्या मदतीसाठी अनेक स्वंयसेवी व सामाजिक संस्था आणि समाजातील दानशूर पुढे येऊन मदत करीत आहेत. ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. मात्र ही मदत करीत असताना बºयाच जणांना आपल्या अवतीभवती असणाºया आणि आपल्या नेहमी संपर्कात येणाºया गरजूंचा विसर पडत आहे. नेमकी हीच बाब हेरुन गोंदिया येथील व्यावसायिक अभय सावंत यांनी त्यांच्या दुकानात व त्यांच्या संपर्कातील गरजू व्यक्तींची यादी तयारी करुन त्यांना महिनाभराचे अन्नधान्य उपलब्ध करुन दिले.सावंत यांचे गोंदिया रेल्वे स्थानकावर कॅटिंग आणि रेल्वे फलाटावर शॉप आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांची कॅटिंग बंद झाली. जेव्हा कॅटिंग सुरू होती तेव्हा त्यांच्याकडे ४० च्यावर वेंडर काम करीत होते. तर त्यांच्या दुकानात सामान आणून देणारा रिक्षा चालक, पाणी आणून देणार, झाडू मारणारा, घरी भांडीधूनी करणारी घरकामगार महिला व तसे त्यांच्या या व्यवसायात त्या मदत होणारे अनेक गरजू व्यक्ती त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आधी या सर्व जणांची एक यादी तयार केली जवळपास ७० ते ८० नावे त्यांच्या अवतीभवती आणि नेहमी संपर्कात येणाºया गरजू व्यक्तींची झाली. त्यांनी या सर्वांना एक महिन्याचे किराणा सामान आणि अन्नधान्य त्यांना घरपोच पोहचवून दिले. तसेच लॉकडाऊनच्या कालावधी या गरजूंची पायपीट होवू नये म्हणून त्यांनी त्यांच्या परिसरातच असणाºया किराणा दुकानातून हे साहित्य कसे उपलब्ध होईल, यासाठी त्यांच्याकडे काम करणाºया प्रदीप बागडे व अनिल हुमणे यांच्याकडे जवाबदारी सोपविली. त्यांनी सुध्दा ती तेवढ्याच जवाबदारीने पार पाडली. त्यामुळेच या गरजूंना त्यांच्या घरी थेट मदत पोहचल्यानंतरच त्यांना याची माहिती मिळाली. आज आपण त्यांच्याकडे काम करीत नसलो तरी सावंत यांनी आपली जाणीव ठेवून आपल्या गरजेच्या काळात मदत केल्याबद्दल त्यांना फोन करुन त्यांचे आभार सुध्दा मानले. एवढेच नव्हे तर लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यास पुन्हा सर्वांना एक महिन्याचा किराणा आणि अन्नधान्य देण्याची तयारी सावंत यांनी करुन ठेवली आहे. अभय सावंत यांच्याप्रमाणेच इतरांनी ही आपल्या जवळच्या आपल्या नेहमी संपर्कात येणाऱ्यांचा शोध घेवून मदत केल्यास कुणावर उपासमारीची वेळ येणार नाही. तसेच या गरजूवंताना सुध्दा आपल्या पडत्या काळात कुणी धावून आल्याची जाणीव होईल.ज्या व्यक्तींमुळे आपल्या व्यवसायास हातभार लागला असेल अशा गरजूंचा शोध घेऊन मदत करण्याची हीच योग्य वेळ आहे. संकटाच्या काळात गरजूंना अवश्य मदत करा, पण आपल्या अवतीभवती आणि नेहमी संपर्कात येणाºया गरजूंचा विसर न पडू देता त्यांची आवश्यक मदत करा. यासर्वांना आपण घरीच बसून मदत करु शकतो यासाठी आपल्याला घराबाहेर सुध्दा पडण्याची गरज नाही. अशाच जवळच्या गरजूंचा शोध घेऊन मदत केल्यास कुणीही उपाशी राहणार नाही.- अभय सावंत,व्यावसायिक गोंदिया.पीएस,सीएम फंडात जमा करा मदतगरजूवंतांना मदत करण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे येत आहे.ही खरोखरच माणुसकीचे दर्शन घडविणारा बाब आहे. ज्या अशा गरजूंची मदत करायची त्यांनी मुक्त हस्ताने पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री मदत निधी मदत द्यावी.पण ही मदत करताना आपल्या जवळच्या आणि नेहमी संपर्कात येणाºयाचा मात्र विसर पडता कामा नये.

टॅग्स :Socialसामाजिकsocial workerसमाजसेवक