लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : जवळील ग्राम देऊळगाव (बोदरा) येथे मागील कित्येक वर्षांपासून राहत असलेल्या गोपाळ समाजातील ६ कुटुंबांची ‘लॉकडाऊन’मुळे चांगलीच अडचण झाली आहे. भीक मागून दोन वेळची चूल पेटविणाऱ्या या कुटुंबांची व्यथा ‘लोकमत’ने बुधवारी (दि.८) प्रसिद्ध करताच त्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. यावर अर्जुनी-मोरगावचे ठाणेदार महादेव तोंदले यांनी त्यांच्या वस्तीमध्ये जावून अन्नधान्यासह जीवनोपयोगी वस्तुंचे वाटप केले.जवळील ग्राम देऊळगाव-बोदरा येथे मागील काही वर्षांपासून आपल्या झोपडीवजा घरात गोपाळ समाजातील कुटुंब कायमस्वरुपी वास्तव्याने राहत आहेत. दारोदारी भिक मागून दोन वेळची चूल त्यांच्या घरी पेटते. मात्र ‘लॉकडाऊन’ झाल्याने कोणालाही घराबाहेर पडता येत नाही. अशात आजघडीला त्यांची स्थिती जवळून पाहण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अमरचंद ठवरे यांनी त्यांची वस्ती गाठली. सध्या तेथे शंकर राऊत, किशोर राऊत, अशोक राऊत, हिरामण नेवारे, दिलीप नेवारे यांचे कु टुंंब राहत आहे. सुमारे २० लोकांची ही वस्ती असून गावातील लोकांचे मनोरंजन करणारे मेहनती खेळ दाखवून तसेच घरोघरी फिरुन भिक्षा मागून जीवनाचा उदरनिर्वाह करणे हीच नित्यनेम जीवनशैली आहे. आत्तापर्यंत त्यांची शिधापत्रिका बनली नसल्यामुळे त्यांना तांदूळ, गहू व जीवनावश्यक वस्तुंपासून वंचित राहावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.संचारबंदीत त्यांची वाताहत होऊ नये म्हणून ग्रामपंचायतने तांदूळ व ईतर जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. तर आपल्या परिसरात गोपाळ समाज हलाखीचे जीवन जगत असल्याची माहिती ठाणेदार तोंदले यांना सामाजिक कार्यकर्ते ठवरे यांनी देताच त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह त्यांची वस्ती गाठली. स्वत: गोपाल समाजबांधवाच्या वस्तीमध्ये जावून त्या ६ कुटूंबाना तांदूळ, दाळ, तेल, मिरची, हळद इत्यादी साहित्यांचे वाटप करुन सामाजिक बांधीलकीचा प्रत्यय आणून दिला.यावेळी सरपंच शंकर उईके, शिपाई घनश्याम मुळे, चैतराम हुकरे, मोरेश्वर कोसरे, ठवरे उपस्थित होते. गोपाळ समाजाची आजची परिस्थिती पाहुन जाता सामाजिक कार्यकर्ते कोसरे यांनी त्या कुटुंबांना रोख रक्कम ही दिली.दानदाते आले पुढेत्या गोपाळ समाजबांधवांची व्यथा ‘लोकमत’मध्ये बातमीतून प्रसिद्ध होताच अनेक दानदात्यांनी मदत करण्याची इच्छा प्रगट केली. ग्राम चान्ना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन कुलसुंगे, विठ्ठल नेवारे, कैलाश हांडगे, हभप. एकनाथ मेश्राम, कृष्णा खंडाईत यांनीही मदत करण्याची तयारी दाखविली.
पोलिसांनी दिला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 5:00 AM
जवळील ग्राम देऊळगाव-बोदरा येथे मागील काही वर्षांपासून आपल्या झोपडीवजा घरात गोपाळ समाजातील कुटुंब कायमस्वरुपी वास्तव्याने राहत आहेत. दारोदारी भिक मागून दोन वेळची चूल त्यांच्या घरी पेटते. मात्र ‘लॉकडाऊन’ झाल्याने कोणालाही घराबाहेर पडता येत नाही. अशात आजघडीला त्यांची स्थिती जवळून पाहण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अमरचंद ठवरे यांनी त्यांची वस्ती गाठली.
ठळक मुद्दे‘लोकमत’च्या वृत्ताने दानदाते आले पुढे : गोपाळ समाज कुटुंबांना वस्तूंचे केले वाटप