लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील आठ दहा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी (दि.२१) सायंकाळच्या सुमारास जोरदार हजेरीे लावली. जवळपास दीड ते दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले. तर सर्वाधिक ११७ मि.मी.पावसाची नोंद अर्जुनी मोरगाव तालुक्यात झाली. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक घरांची पडझड झाली तर महागाव नाल्याला पूर आल्याने या गावाचा तालुक्याशी काही तास संर्पक तुटला होता. मागील चौवीस तासात जिल्ह्यातील नऊ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून ३२३.३९ मि.मी.पावसाची नोंद झाली.सोमवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्यात सुध्दा वाढ झाली आहे. धरणाची वाढती पाण्याची पातळी लक्षात घेवून पुजारीटोला धरणाचे २ गेट, कालीसरार २ गेट आणि धापेवाडा प्रकल्पाचे पाच गेट उघडण्यात आले होते. हवामान विभागाने मंगळवार, बुधवारी सुध्दा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदीकाठालगतच्या गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाचा काही प्रमाणात पिकांना सुध्दा फटका बसला. सडक अर्जुनी तालुक्यातील बंधारा वाहून गेल्यामुळे बंधाऱ्यालगत असलेल्या शेतकºयांची केलेली रोवणी वाहून गेली. यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर जिल्ह्यातील इतर भागात पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र जिल्हा कृषी विभागाकडे याबाबत अद्यापही नुकसानीचीे अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. नुकसानीचे पंचनामे केल्यानंतरच अधिकृत आकडा सांगता येणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने ५० ते ६० घरांची पडझड झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. महसूल विभागाने नुकसानीचे सर्वेक्षण सुरू केले आहे. दरम्यान या पावसाचा जिल्ह्यातील काही भागातील शेतकºयांना फायदा सुध्दा झाला आहे. पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात सुध्दा समाधानकारक वाढ झाली आहे.वीज पडून इसम ठारसोमवारी (दि.२१) सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. दरम्यान तिरोडा तालुक्यातील मुरमाडी येथील सुदाम भुरनशा टेकाम यांचा वीेज पडून मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.या महसूल मंडळात अतिवृष्टीसोमवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील नवेगावबांध, बोंडगावदेवी, अर्जुनी मोरगाव, केशोरी, महागाव, सौंदड, डव्वा, सडक अर्जुनी या महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील नऊ महसूल मंडळात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 9:32 PM
मागील आठ दहा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी (दि.२१) सायंकाळच्या सुमारास जोरदार हजेरीे लावली. जवळपास दीड ते दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले.
ठळक मुद्देदोन तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद : घरांची पडझड