लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाला. तर कीडरोगांमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. तर वादळी पावसाचा फटका सर्वाधिक फटका अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धानपिकांना बसला. मात्र यानंतरही कृषी विभागाने शासनाला पाठविलेल्या अहवालात या तालुक्यात सर्वाधिक धानाचे उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या या अफलातून अहवालामुळे चांगलाच संभ्रम निर्माण झाला आहे.जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ कृषी विभागाने दिलेल्या धानाच्या उत्पादनाच्या अंदाजावर कोणत्या तालुक्यात किती धान खरेदी करायची याचे नियोजन करते. मात्र यंदा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने वर्तविलेल्या अंदाजावरुन चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. कीडरोग आणि वादळी पावसामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यात सर्वाधिक पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पालकमंत्री बडोले हे तालुक्यातील गावागावांमध्ये जाऊन शेतकºयांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन देत आहे. त्यामुळे या तालुक्यात दुष्काळ सदृश्य स्थिती असल्याचे स्पष्ट होते. मात्र दुसरीकडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय याच तालुक्यात सर्वाधिक उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करित आहे. त्यामुळे पालकमंत्री खरे बोलत आहेत की जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे समजायला शेतकºयांना मात्र मार्ग नाही.खरीपातील तालुकानिहाय धानाचे उत्पादन किती होईल. याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना २६ आॅक्टोबरला पाठविला. या पत्रात, आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये गोंदिया जिल्ह्यात ५४ टक्के पाऊस झाला. यंदा कमी पावसामुळे धानाच्या हेक्टरी उत्पादन होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नाही त्यांना १६९० किलो दर हेक्टरी उत्पादन होईल.ज्या शेतकऱ्यांकडे सिंचन व्यवस्था आहे त्यांना ३८६० किलो उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली आहे. जिल्ह्यात सर्वात कमी धानाचे उत्पादन देवरी तालुक्यात १६९८ किलो दर हेक्टरी होण्याची अंदाज कृषि अधिकारी यांनी पाठविलेल्या अहवालातून व्यक्त केला आहे.
दुष्काळी भागातच सर्वाधिक उत्पन्नाचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:50 AM
यंदा जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाला. तर कीडरोगांमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. तर वादळी पावसाचा फटका सर्वाधिक फटका अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धानपिकांना बसला.
ठळक मुद्देकृषी विभागाचा अफलातून कारभार : जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमात