लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : अर्जुनी-मोरगाव ते ईटखेडा राज्य मार्गादरम्यान संभाजीनगर टी-पॉर्इंटवर खड्डेच खड्डे आहेत. राज्यमार्गावरची खड्ड्यातील खडी जिल्हा मार्गावर गेल्याने नुकतेच कित्येकांना दुखापत झाली. खड्डेमुक्त महाराष्ट्राच्या योजनेची सार्वजनिक बांधकाम उपविभाग अर्जुनी-मोरगावद्वारे बोळवण केली जात आहे. खड्डे दाखविल्याने राज्याचे बांधकाम मंत्र्यांनी बक्षीस जाहीर करावे अन्यथा खड्डे बुजविण्याचे संबंधित विभागाला निर्देश द्यावे अशी मागणी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मनोहर शहारे यांनी केली आहे.सार्वजनिक बांधकाम उपविभाग अर्जुनी-मोरगाव सध्या गाढ झोपेत आहे. कोहमारा- अर्जुनी मोरगाव-वडसा राज्यमार्गाचे कोट्यवधी रुपये खर्चून उन्हाळ्यात डांबरीकरण झाले. सध्या पावसाळ्याला फक्त सुरुवात झाली असताना रस्त्यावर खड्डे पडले आहेत. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी फक्त तालुक्यातील रस्त्यांचे परीक्षण केल्यास मोठे घबाड समोर येण्याची शक्यता असून त्यामध्ये अभियंत्यांसह कंत्राटदाराचे साटेलोटे पुढे येवू शकते.अर्जुनी-मोरगाव ते ईटखेडा राज्य मार्गादरम्यान संभाजीनगर टी पार्इंटवर ईटखेडा-वडेगाव रेल्वे, चारभट्टी कडे जाणाऱ्यास्थळी नेमका राज्य मार्गावर वळण रस्ता असून खड्डेमय झाला आहे. राज्यमार्गाची खड्ड्यातील संपूर्ण खडी बाजूच्या ग्रामीण मार्गावर पसरली असून या दरम्यान कित्येक अपघात घडले आहेत.ईटखेडा व सभोवतालच्या परिसरातील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी सायकलने अर्जुनी-मोरगावला येतात व हा वळण मार्ग आणि त्यातील खड्डे अपघातग्रस्त स्थळ ठरला आहे. परंतु दोन्ही बाजूला वळण मार्ग चिन्ह दर्शविण्याचे सौजन्य सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापही दाखविले नाही. पावसाच्या सरुवातीस अशी दशा आहे तर भर पावसात या मार्गाच्या अवदेशाची कल्पनाच केलेली बरी.शाळा-महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी रस्त्यावरील खडी वेचून बाजूला ठेवण्याचे सामाजिक भान जोपासत आहेत. नागपूर येथील पावसाळी अधिवेशनात बांधकाम मंत्री आहेत. विदर्भाच्या जनतेचे हित जोपासण्यासाठी सदर बाबीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा राष्टÑवादी काँग्रेस तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शहारे यांनी दिला आहे.
राज्यमार्ग वळणावरील खड्डे धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 10:00 PM
अर्जुनी-मोरगाव ते ईटखेडा राज्य मार्गादरम्यान संभाजीनगर टी-पॉर्इंटवर खड्डेच खड्डे आहेत. राज्यमार्गावरची खड्ड्यातील खडी जिल्हा मार्गावर गेल्याने नुकतेच कित्येकांना दुखापत झाली. खड्डेमुक्त महाराष्ट्राच्या योजनेची सार्वजनिक बांधकाम उपविभाग अर्जुनी-मोरगावद्वारे बोळवण केली जात आहे.
ठळक मुद्देमनोहर शहारे : बांधकाम मंत्र्यांनी बक्षीस जाहीर करावे