लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : यंदा पावसाने सर्वांच्या डोळ््यात पाणी आणले असून कमी पावसाचा शेतीवर जास्तच परिणाम जाणवला. परिसरात शेतकºयांनी कसेबसे करून हलके धान लावले व ते वाढलेही. मात्र आता त्यावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. शासनाने शेतकºयांना भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.धान निघाल्याने शेतकरी काही तरी हाती येणार या अपेक्षेत होता. मात्र आता धानावर मावा, तुडतुडा सारख्या रोगांनी धावा केला आहे. यामुळे शेतात उभे धान वाळू लागले आहे. डोळ््या समोर पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. शासनाने कर्जमाफी केली, मात्र कर्जमाफी कुणाची झाली हेच आतापर्यंत कळलेले नाही. त्यात यंदा पावसाने दगा दिला.निसर्गाची मार खात शेतकरी कसा तरी शेती करीत असतानाच यंदा रोगांनीही पिकांची नासधूस करून टाकली. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. कृषी व तहसील कार्यालयाने परिसरातील शेतीची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.पाच एकरात काहीच नाहीयेथील मधू मोतीराम भेंडारकर यांनी पाच एकर शेतात धान लावले आहे. लागवडीपासून आता फवारणीपर्यंत त्यांनी सुमारे एक लाख रूपये खर्च केले. मात्र असे असतानाही त्यांच्या शेतातून काहीच पीक हाती येणार नसल्याचे दिसत आहे. रोगांमुळे धान करपले असून हे चित्र बघून भेंडारकर चिंतेत आहेत.
शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 9:58 PM
यंदा पावसाने सर्वांच्या डोळ््यात पाणी आणले असून कमी पावसाचा शेतीवर जास्तच परिणाम जाणवला
ठळक मुद्देपिकांवर रोगांचा प्रादुर्भाव : शासनाकडे भरपाईची मागणी