गोंदिया : होम मिनिस्टर म्हणून महिलांना संबोधल्या जाते, ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला रविवारी शहरातील अनेक महिलांनी महिला दिवस साजरा करण्यासाठी 'एक दिन सायकल के नाम' या उपक्रमात सहभागी होऊन सायकल चालवून पर्यावरण संवर्धन आणि सुदृढ आरोग्याचा संदेश दिला. हा उपक्रम प्रथमच शहरात आयोजित करण्यात आला होता.
महिलांचे आरोग्य सुदृढ राहिले तर कुटुंबाचे आरोग्यही निरोगी राहते. पण दिवसेंदिवस आधुनिक पद्धतीचा उपयोग घरच्या आहारात केल्या जातो. सामाजिक कार्यकर्ता, नोकरदार, गृहिणी कामाच्या व्यस्ततेत आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळेच महिलांमध्ये लठ्ठपणा, शारीरिक कमजोरी तथा अनेक समस्यांना सामोर जावे लागते. वेळेवर उपचार न झाल्याने गंभीर आजारालासुद्धा बळी पडावे लागते. याचीच दखल घेत महिलांनी एकत्रित येऊन आपले आरोग्य निरोगी रहावे, यासाठी 'एक दिन सायकल के नाम' या उपक्रमात सहभाग महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सायकल चालवून पर्यावरण संवर्धन, आरोग्य व महिला दिनाचा संदेश घराघरापर्यंत पोहचविला. या उपक्रमात शहरातील प्रसिध्द डॉक्टर, शिक्षिका, सामाजिक कार्यकर्त्या, गृहिणी सहभागी झाल्या होत्या. सायकल चालवून महिला फिट तर कुटुंब सुपरहिट असा संदेश दिला आहे.
.......
तीन वर्षांपासून विविध उपक्रम
विशेष म्हणजे की 'एक दिन सायकल के नाम' हा उपक्रम मागील तीन वर्षापासून सातत्याने राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दर रविवारी सायकल चालवून पर्यावरण व आरोग्याचा संदेश दिला जातो. या उपक्रमात जेसीआई गोंदिया राईस सिटी व आज फोरम यांचा मोलाचा वाटा आहे.
.....
खर्चाची बचत व आरोग्यासाठी लाभदायक
सायकल चालविण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. परंतु आरोग्यासह खर्चाची ही बचत सायकलमुळे होत आहे. सायकल चालविल्याने शरीराची संपूर्ण हालचाल होत असल्याने आरोग्य निरोगी राहते. प्रत्येक व्यक्ती आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी सायकलचा अधिकचा वापर केला तर इंधन बचतीसह खर्चाची ही मोठी बचत प्रदूषण कमी करण्यास सुध्दा मदत होते. इंधनाचे भाव गगनाला भिडत आहेत. अशात इंधन बचतीसाठी सायकल हा उत्तम पर्याय आहे.