गावखेड्यात असलेल्या मिलिंद विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात २५ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ३२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तर एक विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. ग्राम सोमलपूर येथील गुंजन अशोक बोरकर हिने ९४ टक्के गुण घेऊन विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळविला. बाक्टी येथील प्रवीण बाबुली चवरे ८९.२० टक्के गुण घेऊन व्दितीय, तर चान्ना येथील जयंत दिलीप रामटेके याने ८८.४० टक्के गुण घेऊन तृतीय क्रमाक पटकाविला. या तिन्ही विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन प्राचार्य राजन बोरकर यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन पालकांसह विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गुंजन हिने वैद्यकीय क्षेत्र, प्रवीण याने अर्थशास्त्र, तर जयंतने सनदी अधिकारी बनण्याचे ध्येय उराशी बांधल्याचे सांगितले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या व्यवस्थापकांनी कौतुक केले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा घरपोच सत्कार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 4:19 AM