गोंदिया : गावची शाळा-आमची शाळा या अभिनव प्रकल्पात जिल्ह्यातुन प्रथम आलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इर्रीटोला येथे घरभेट व शैक्षणिक पदयात्रा या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.शाळा प्रारंभीच्या पूर्वदिनी झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या या नियोजित कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, उपाध्यक्ष व शिक्षण व आरोग्य सभापती मदन पटले, गटशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी, केंद्रप्रमुख अशोक बरईकर, सी.पी. वैद्य, लखन मेंढे, संपत ब्राह्मणकर, रामू वरकडे उपस्थित होते.यावेळी लाऊडस्पिकरवरुन प्रवेशपात्र बालकांच्या नावाची व शाळा सुरु होत असल्याची घोषणा करण्यात आली. यामध्ये सरपंच, व्यवस्थापन समिती, युवक व गावकऱ्यांच्या मदतीने शाळा परिसर स्वच्छ करणे, सडा शिंपणे, रांगोळी काढणे, आब्यांची पाने व फुलांचे तोरण लावून लाऊडस्पिकरवर देशभक्ती गीते लावण्यात आली होती. यानंतर शाळेतील प्रवेशपात्र बालकांची यादी घेऊन जि.प. अध्यक्ष शिवणकर, उपाध्यक्ष पटले, मोहबंशी, बरईकर, वैद्य, कमल ठकरेले, लखन मेंढे, बेनिराम फुलबांधे, देवराज गायधने, संपत ब्राह्मणकर, सुनिता पाथोडे, अर्चना गडपायले, देशमुख, विनोद लिचडे, चावके, शहारे, रहांगडाले व गावकरी सोबत शाळेतील सर्व प्रवेशपात्र बालकांच्या घरी भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना शाळेत पाठविण्याची विनंती करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन शहारे यांनी केले. आभार विनोद लिचडे यांनी मानले.
इर्रीटोला येथे घरभेट शैक्षणिक पदयात्रा
By admin | Published: June 28, 2014 11:39 PM