शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
6
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
7
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
8
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
10
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
11
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
12
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
13
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
14
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
15
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
16
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
17
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
18
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
19
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु

आदर्श शिक्षक व गुणवंताचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 1:03 AM

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून तिरोडा विधानसभा क्षेत्रातील सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श शिक्षक, दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार...

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून तिरोडा विधानसभा क्षेत्रातील सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श शिक्षक, दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजकुमार बडोले होते. पाहुणे म्हणून म्हणून आ. परिणय फुके, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी आ. भजनदास वैद्य, खोमेश रहांगडाले, भाऊराव कठाणे, सलामभाई शेख, कृउबास समितीचे सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प. सदस्य रजनी कुंभरे, मिलींद कुंभरे, डॉ. वसंत भगत, तालुका महिला मोर्चा अध्यक्षा तुमेश्वरी बघेले, तेजराम चव्हाण, जितेंद्र रहांगडाले, घनश्याम पारधी, चर्तुभूज बिसेन उपस्थित होते.बडोले यांनी यावेळी मार्गदर्शन करताना शिक्षकांचे कार्य चांगले असून आपल्या हातून चांगले विद्यार्थी घडावेत असा विचार करावा. कच्च्या हिºयाला जसे महत्व कमी असते तो पूर्ण झाला की त्याला मोल प्राप्त होते. त्याचप्रकारचे शिक्षकांचे कार्य असते, असे पालकमंत्री राजकुमार बडोले म्हणाले. भजनदास वैद्य यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनाील प्रेरक प्रसंग सांगून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी सुसंस्कृत समाजाची निर्मिती करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. नगराध्यक्ष सोनाली देशपांडे यांनी शिक्षकांच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांना हवा असलेल्या भारत घडविण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे आयोजक आ. रहांगडाले यांनी शिक्षकांचे कार्य फार मोठे असून त्यांच्यामुळेच उत्कृष्ट पिढी निर्माण होत असल्याचे सांगितले. सध्या पाण्याअभावी शेतकºयांचे हाल होत आहे. रोवणी झाली नाही. पाणी आवश्यक आहे. खळबंदा जलाशयात पाणी पडले. चोरखमारा व बोदलकसा जलाशयात सुद्धा पाणी पडणे गरजेचे असून त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. पावसाअभावी तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत सरकार शेतकºयांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.यावेळी आदर्श शिक्षक म्हणून हायस्कूल शिक्षक डी.आर. गिरीपुंजे, ए.यू. अंबुले, चरण खोब्रागडे, यु.जी. शेंडे, एच.एस. ठोंबरे, आय.एम. परशुरामकर, ए.आर. चौधरी, एस.डी. सिंगनजुडे, एन.एन. झरारिया, व्ही.एम. टेंभुर्णे, एस.डी. लाड, एच.आर.राणे, पी.एस. डांगे, एम.एल. चापले, जी.आर. बघेले, आय.एस. बोरकर, डी.एस. गौतम, सुनील शेंडे, सविता हटवार, प्रकाश चौधरी, वर्षा सोनी, एन.जे. मिश्रा, हिरालाल शरणागत,ल एम.यू. नागदेवे, रिना जायस्वाल, के.के. बोपचे, ए.के. कापगते, के.टी. आगाशे, पारधी, सेवानिवृत्त १८ शिक्षक, विषय शिक्षक, पदवीधर शिक्षक, सहाय्यक शिक्षकांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच गुणवंत विद्यार्थी सोनल भुरे, अक्षय शेंडे, राकेश अनकर, किरण विजय बिसेन, हिमांशू हरिणखेडे, पुनम नरेश भगत, कल्पक भांडारकर, काजल चव्हाण, वैष्णवी बिसेन, वैभव चव्हान, हिमांशू अशोक पटले, रुचिका पटले यांचाही पाहुण्यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्ययात आला. संचालन माजी जि.प. उपाध्यक्ष मदन पटले यांनी केले तर आभार अनुप बोपचे यांनी मानले. यशस्वितेसाठी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तसेच शिक्षकांचे सहकार्य केले.