लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील पिंडकेपार येथील रामू उरकूडा मौजे यांच्या घराला शार्ट सर्कीटमुळे आग लागून ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना सोमवारी (दि.२२) दुपारच्या सुमारास घडली.प्राप्त माहितीनुसार रामू मौजे हे काही कामानिमित्त साकोली येथे गेले असता त्यांचे कुटूंबही शेतात धान कापण्यासाठी गेले होते. याच दरम्यान शॉट सर्कीटमुळे घराला आग लागली.दरम्यान शेजाऱ्यांना आग लागल्याचे निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरड केली.त्यानंतर गावकºयांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत घरातील कपडे, पंखा, सायकल व इतर साहित्य जळून खाक झाले.घटनेची माहिती तलाठी डहाट यांना देण्यात आली. माहिती मिळताच घटनेचा पंचनामा करून तसा अहवाल त्यांनी वरिष्ठांकडे सादर केला असून या घटनेत रामू मौजे यांचे सुमारे ५० हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमीक अंदाज प्रशासनाकडून वर्तविण्यात येत. तेव्हा मौजे कुटूंबीयांना शासनाकडून त्वरीत आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी गावकºयांनी केली आहे.
शॉट सर्किटमुळे लागली घराला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:15 AM