शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
2
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
3
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
4
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
5
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; कुणाकुणाला संधी? पाहा...
6
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
7
"लाव रे तो व्हिडिओ..."  विषय 'गंभीर', दोन दिवस खेळायला कुणीच नाही 'खंबीर'
8
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
9
एकेकाळी राणेंना आव्हान देणारा शिवसैनिक ठाकरे गटात, परशुराम उपरकर यांनी हाती बांधलं शिवबंधन 
10
भाजपाच्या यादीत किती महिलांना स्थान?; खासदार अशोक चव्हाणांच्या मुलीला मिळाली संधी
11
Somy Ali : "बिश्नोई समाज काळवीटाची पूजा करतो हे सलमानला माहीत नव्हतं, मी त्यांची माफी मागणार"
12
उमेदवार द्यायचे की पाडायचे? मनोज जरांगे पाटील यांनी घेतला मोठा निर्णय, केली महत्त्वाची घोषणा
13
गणपत गायकवाड यांच्या पत्नीला भाजपकडून तिकीट; शिवसेनेचे महेश गायकवाड अपक्ष लढणार?
14
पहिली यादी आली, भाजपाला मोठा धक्का; माजी आमदाराचा पक्षाला रामराम, परिवर्तन महाशक्तीत प्रवेश
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी CM एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार? शिवसेनेचे नेते म्हणाले...
16
अलर्ट! UPI फ्रॉडपासून सावधान; हॅकर्स ओढतात जाळ्यात, एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
17
उद्धव ठाकरेंच्या रणनीतीला शरद पवारांचा ब्रेक?; सांगोला मतदारसंघावरून होणार वाद
18
"पराभवाच्या भीतीमुळेच विरोधकांची मतदार यादीवरून ओरड", भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा टोला 
19
मोठा ट्विस्ट! विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या चिन्हात बदल? आयोगाने घेतला निर्णय
20
महागाईचा चटका! आता CNG सामान्यांचा खिसा खाली करणार, कितीने वाढणार?

कसे मिळविणार हिवतापावर नियंत्रण?

By admin | Published: June 18, 2015 12:49 AM

पावसाळ्याच्या दिवसांत विविध आजार पसरतात. त्यांना नियंत्रित करण्यात आरोग्य व जिल्हा हिवताप कार्यालय ...

५७ पदे रिक्त : कंत्राटी आरोग्य सेवकांचे मानधन प्रलंबितगोंदिया : पावसाळ्याच्या दिवसांत विविध आजार पसरतात. त्यांना नियंत्रित करण्यात आरोग्य व जिल्हा हिवताप कार्यालय अपयशी ठरत आहे. अनेक रूग्णांचा बळी जातो. त्यातच जिल्हा आरोग्य विभागात मंजूर नियमित ९८ पैकी ५७ पद रिक्त आहेत. तसेच मंजूर १६ कंत्राटी आरोग्य सेवकांचे मानधन निधी नसल्यामुळे प्रलंबित आहे. या प्रकारामुळे आरोग्य विभाग आणखी किती जणांचे बळी घेणार? असा प्रश्न उपस्थित होते आहे.देवरी, सालेकसा, अर्जुनी-मोरगाव व तिरोडा या तालुक्यांमध्ये पावसाळ्यात अनेक संक्रामक आजार पसरतात. मात्र कोट्यवधी रूपये खर्चून जनतेला आरोग्य सेवा पुरविण्याचा प्रचार करणाऱ्या आरोग्य विभागाला रिक्त पदांमुळे मृतकांची संख्या सांगण्यात काहीच गैर वाटत नाही. ग्रामीण व शहरी क्षेत्रात आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केले आहे. सर्व नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, हा यामागील हेतू होता. आरोग्य उपकेंद्र ते जिल्हा परिषद व जिल्हा सामान्य रूग्णालय ते जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय सर्वांनाच कोट्यवधी रूपये खर्च करण्याची सूट दिली आहे. परंतु हा निधी केवळ खरेदी व बांधकाम कार्यावरच खर्च होते. खरे पाहता सामान्य नागरिकांना आतासुद्धा खासगी डॉक्टरांवरच अवलंबून रहावे लागते.देवरी, अर्जुनी-मोरगाव व सालेकसा तालुक्याच्या जंगलव्याप्त क्षेत्रात रूग्णालये आहेत. परंतु अधिकारी व कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे अप्रिशिक्षित खासगी डॉक्टरांना देवच पावतो. सुरू वित्तीय वर्षात तीन महिन्यांत चार जणांना हिवतापामुळे प्राणास मुकावे लागले. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील विहीरगाव, केशोरी आदी गावांत नागरिकांना हिवताप व डेंग्यू आजारांनी ग्रासले. मागील वर्षी पावसाळ्यात अनेक गावांत संक्रमक आजार पसरले होते. वेळेवरच झोपेतून जागे होणारा आरोग्य विभाग काय कामाचा. हिवताप नियंत्रित करण्यासाठी जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाची स्थापना करण्यात आली. राज्य शासनाच्या वतीने या विभागास फवारणी, संक्रमक आजारांवर नियंत्रण, रक्ताच्या नमूण्यांची तपासणी आदी कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु प्रामुख्याने गाव स्तरावर कार्य करणाऱ्या आरोग्य सेवकांचे पद अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे या विभागाची उद्दिष्टपूर्ती होत नाही. (प्रतिनिधी)हिवताप निर्मूलनावर प्रश्नचिन्हजिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाला नियमितरित्या ९८ आरोग्य सेवकांच्या पदांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी ५७ पद आजही रिक्तच आहेत. तसेच १६ कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सेवकांचे पद रिक्त आहेत. ३१ मार्च २०१४ पासून निधी नसल्याचे कारण सांगून ही पदे अद्याप भरण्यात आली नाहीत. त्यामुळे संक्रामक आजार व हिवतापाचे निर्मूलन कसे होईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.फवारणीच्या औषधांची समस्याजिल्हा आदिवासीबहुल आहे. त्यामुळे आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून या क्षेत्रात फवारणी करण्यासाठी ‘अल्फ्रामेथिन’ व इतर पॉवडर दुसऱ्याच जिल्ह्यात पाठविण्यात येत असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात साठवण करून योग्य वेळी औषध रवाना केली जात असल्याची चर्चा सुरू आहे.