लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत जिल्ह्यातील खरीप हंगामात ७० हजार ३१ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका जिल्ह्यातील धान पिकाला मोठ्या प्रमाणात बसला. शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील ४ हजार ३२७ शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तयार करुन विमा कंपनीकडे पाठविण्यात आले. मात्र पंचनाम्याच्या तुलनेत पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक असून ६५ हजार शेतकरी पीक विम्याचा लाभ मिळण्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शेतकरी पिकांचा विमा काढतात. यासाठी शासनाने विविध जिल्ह्यात वेगवेगळ्या विमा कंपन्याची नियुक्ती केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील पीक विम्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीची नियुक्ती शासनाने केली आहे.यातंर्गत जिल्ह्यातील ७० हजार ३१ शेतकऱ्यांनी एकूण ३९ हजार १२९ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला. यासाठी विमा कंपनीकडे प्रीमियम विमा कंपनीकडेभरला. ७० हजार शेतकऱ्यांनी प्रीमियमच्या रक्कमेपोटी २ कोटी ८३ लाख ८८ हजार रुपये विमा कंपनीकडे भरले. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाई झाल्यास काही तरी नुकसान भरपाई मिळून मदत होईल,अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. गेल्या खरीप हंगामात ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने याचा फटका धान पिकांना बसला.अनेक शेतकऱ्यांना हाती आलेले पीक गमवावे लागले. तर काही शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघाला नाही. शेतकऱ्यांची ओरड वाढल्यानंतर शासनाने परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन आर्थिक मदत जाहीर केली. यासाठी जिल्ह्यातील ९ हजार ७४२ शेतकरी पात्र ठरले होते. मात्र ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता त्यांना पीक विमा योजनेतंर्गत नुकसान भरपाई देण्याचे निर्देश शासनाने दिले.यातंर्गत पीक विमा कंपनीने जिल्ह्यातील एकूण ४ हजार ३२७ शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करुन परतावा मिळण्यासाठी पाठविल्याची माहिती आहे.मात्र पीक विमाधारक आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या तुलनेत विमा कंपनीकडे पाठविलेल्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे.त्यामुळे पीक विमा योजनेचा लाभ नेमका किती शेतकऱ्यांना मिळणारअसा प्रश्न निर्माण झाला आहे.तीन महिने लोटूनही परतावा नाहीज्या पीक विमाधारक शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसान झाले. त्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन विमा प्रतिनिधीने कंपनीकडे तीन महिन्यापूर्वीच पाठविले. मात्र अद्यापही विमा कंपनीकडून नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. यासंदर्भात विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता पुन्हा महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे सांगितले.
पीक विम्याचा लाभ किती शेतकऱ्यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 6:00 AM
जिल्ह्यातील ७० हजार ३१ शेतकऱ्यांनी एकूण ३९ हजार १२९ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला. यासाठी विमा कंपनीकडे प्रीमियम विमा कंपनीकडेभरला. ७० हजार शेतकऱ्यांनी प्रीमियमच्या रक्कमेपोटी २ कोटी ८३ लाख ८८ हजार रुपये विमा कंपनीकडे भरले. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाई झाल्यास काही तरी नुकसान भरपाई मिळून मदत होईल,अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.
ठळक मुद्देकेवळ ४ हजार ३२७ शेतकऱ्यांचे पंचनामे पाठविले : परताव्यासाठी पुन्हा प्रतीक्षाच