गोंदिया: कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयावह होती. त्याचा अनुभव जिल्हावासीयांनी घेतला असला तरी दुसरी लाट ओसरताच मोठ्या प्रमाणात लोक घराबाहेर पडू लागले. घराबाहेर पडताना लोक सैरावैरा पळू लागले. दुकानात, बाजारात, दवाखान्यात, बसस्थानक, रेल्वेस्थानक येथे गर्दी करू लागल्याने येणारी तिसरी लाट (डेल्टा प्लस) कसे रोखणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी प्रत्येकाने तोंडाला मास्क लावण्याची गरज आहे.
........................
मास्क वापरणाऱ्यांवर कारवाई नाही
-कोरोनाचा संसर्ग मागील दीड वर्षापासून असल्याने कोरोनाच्या बचावासाठी वापरण्यात येणारे मास्क वापरून लोक कंटाळले आहेत.
- कोरोनाचा बचाव म्हणून तोंडाला मास्क लावणे आवश्यक असताना लोक घराबाहेर पडल्यावरही तोंडाला मास्क लावताना दिसत नाही.
- पोलीस बंदोबस्त करीत असताना त्यांच्या समोरून विनामास्कने लोक जात असले तरी त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही.
.......................
पोलिसांचाही मास्क तोंडाखाली
- बंदाेबस्तात असलेल्या अनेक पोलिसांचा तोंडावर मास्क नसतो. कोरोना निघून गेल्याचा जणू भास त्यांना होत असावा.
-पोलिसांनी मास्क वापरला तर तो २० मिनिटात हनुवटीवर आणून ठेवले जाते. हनुवटीवर मास्क लावून पोलीस काम करताना दिसतात.
- स्वत:चाच मास्क हनुवटीवर असेल तर विनामास्क जाणाऱ्यांवर पोलीस काय कारवाई करतील.
...............
पोलीस प्रमुखाचा कोट
सुरुवातीला पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे काम आमचे पोलीस करतात. लोकांनी कोरोना संदर्भात स्वत: जागृत राहून कारवाईच्या भीतीने मास्क लावण्यापेक्षा जीवाच्या भीतीने मास्क लावावेत.
- दिनेश तायडे, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा.
..............