..........
शहरातील भिकारी
१८००
बेघर निवाऱ्यात राहणाऱ्यांची संख्या
५४३
महिला
८४३
पुरुष
९६७
............
आधारकार्ड नाही त्यांचे लसीकरण कसे होणार
- कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारने आधारकार्ड अनिवार्य केले आहे. ज्यांच्याकडे आधारकार्ड नसेल त्यांच्याकडे पॅनकार्ड असले तरी कोरोना लसीकरण केले जाणार आहे. मात्र, ज्यांच्याकडे हे दोन्ही नाही त्यांना तूर्तास तरी लसीकरण करण्यात येणार नाही.
- भिकारी किंवा भटकंती करणाऱ्यांकडे आधारकार्ड नसते, शिवाय बेघर निवाऱ्यात राहणाऱ्या लोकांकडे सुद्धा आधारकार्ड नाही. मात्र, अशात त्यांना कोरोना लसीकरण करण्यात येणार नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात अशा लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
........
बेवारस नागरिकांची सर्वाधिक संख्या गोंदिया शहरात
हावडा-मुंबई रेल्वे मार्गावर गोंदिया शहर असल्याने या ठिकाणी रेल्वे अनेक भिकारी तसेच भटकंती करणारे नागरिक मोठ्या प्रमाणात दाखल होतात. त्यामुळेच गोंदिया शहरात बेवारस नागरिक आणि भिकाऱ्यांची संख्या अधिक आहे.
- रेल्वे स्थानक आणि शहरातील उड्डाणपुलाच्या खाली या लोकांचे अधिक वास्तव्य आहे.
......
कोट :
भटकंती करून जीवन जगणाऱ्या लोकांकडे आधारकार्ड नाही म्हणून त्यांना कोरोना लसीकरणापासून वंचित ठेवणे चुकीचे आहे. शासनाने त्यांचासुद्धा प्राधान्याने विचार करून कोरोना लसीकरणाची सुविधा त्यांना उपलब्ध करून द्यावी.
- सविता बेदरकर, अध्यक्ष पहांदी पारी कुपार लिंगो बहुउद्देशिय संस्था.
.........