गोंदिया : कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. २६ जून रोजी उघडणाऱ्या शाळा पाच महिन्यांनंतर म्हणजे २३ नोव्हेंबरला सुरू करण्यात आल्या. शासनाने कोरोनाच्या संकटाला पाहून २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे, परंतु शाळा सुरू झाल्यापासून परीक्षेचा वेळ येईपर्यंत पाच महिन्यांचाच कालावधी मिळत आहे. त्यातही एक दिवसाचा खंड देऊन विद्यार्थांना शिकविले जात आहे. त्यामुळे दहावी किंवा बारावीचा असलेल्या अभ्याक्रमापैकी ७५ टक्के अभ्याक्रम या काळात पूर्ण होणार नाही. त्यामुळे फक्त ५० टक्केच अभ्यासक्रम शासनाने ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
२३ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या शाळांत फक्त ३७ टक्केच विद्यार्थी आतापर्यंत पाेहोचले आहेत. त्या ३७ टक्के विद्यार्थ्यांपैकी अर्ध्या विद्यार्थांना शिकविले जाते, तर उर्वरित अर्ध्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या दिवशी तोच अभ्यासक्रम शिकविला जातो. आता जानेवारी महिना अर्धा लोटला असून, विद्यार्थ्यांची संख्या वाढली नाही. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम समजणेही आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला असला, तरी आणखी २५ टक्के म्हणजेच संपूर्ण अभ्यासक्रमातून ५० टक्के अभ्यासक्रम कमी करण्याची गरज आहे.
बॉक्स
दहावीचा अभ्यासक्रम ७५ टक्के
दहाव्या वर्गाचा अभ्यासक्रम असलेल्या पुस्तकातील २५ टक्के अभ्यासक्रम कमी केल्याची माहिती शिक्षण विभागाला देण्यात आली. त्या ७५ टक्के अभ्याक्रमावर मुलांना शिकविण्याचे काम केले जात आहे, परंतु हे अभ्याक्रम वेळेच्या आत पूर्ण करण्यात येणार नाही.
बॉक्स
बारावीच्या अभ्यासक्रमाला वेळ अपुरा
बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्यात आला आहे. मार्चऐवजी मे महिन्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येत असल्याने, दोन महन्याची उसंत मिळाली, परंतु एवढ्या कमी वेळेत ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण कसा करणार, असा प्रश्न शिक्षकांपुढे आहे.
कोट
विद्यार्थ्यांना एक दिवस आड शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यात गती नाही. परीक्षा दोन महिने पुढे ढकलण्यात आल्या, परंतु पाच महिन्यांनंतर सुरू झालेले अभ्यासक्रम एक दिवस आड विद्यार्थ्यांना शिकविले जात असल्याने, अभ्यासक्रम कमी करण्याची गरज आहे.
अनिल मुरकुटे
मुख्याध्यापक विद्या निकेतन आमगाव.
कोट
ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची ऑनलाइन अभ्यासक्रमामुळे झालेले नुकसान आता भरून निघेल. शासनाने २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. ७५ टक्के अभ्यासक्रम हे एप्रिलपर्यंत पूर्ण होईल. कोरोनाची लाट आता आली नाही, तर निश्चितच अभ्यासक्रम पूर्ण होईल.
व्ही.डी. मेश्राम,
प्राचार्य, पंचशिल हायस्कूल व कनिष्ट महाविद्यालय मक्काटोला.
कोट
२३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू झाल्यावर चारच तास शाळा भरली. यात वर्गातील अर्धे विद्यार्थी एका दिवशी तर अर्धे विद्यार्थी दुसऱ्या दिवशी शाळेत आले. शिक्षकांनी एक दिवस आड दिलेल्या शिक्षणामुळे आमचा अभ्यास मागील काळापेक्षा संथ गतीने चालत असल्याचे वाटते.
- स्मिता रविशंकर हुकरे, वर्ग १०वा आदर्श विद्यालय आमगाव
कोट
दरवर्षीच्या तुलनेत यंदा पाच महिने उशिरा शाळा सुरू झाल्यात, त्यातच एक दिवसाचा खंड घेऊन आम्हाला शिक्षण मिळाले. २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला, परंतु ७५ टक्के अभ्यासक्रमाला अर्धा वेळ त्यातही एक दिवस आड पुढची माहिती मिळत असल्याने विद्यार्थ्यांवर बोझा पडत आहे. आणखी २५ टक्के अभ्यासक्रम कमी करावा.
संदीप बारसे, वर्ग १२वी पंचशिल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मक्काटोला