शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मानवी हस्तक्षेपामुळे करकोच्याचे अस्तित्व धोक्यात; संवर्धनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 3:26 PM

Gondia News नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान परिसरात बहुसंख्येने दिसणाऱ्या उघड्या चोचीचा करकोचांची संख्या हल्ली रोडावलेली दिसून येत आहे. करकोचा व इतर पक्ष्यांच्या खाद्यांना मानवाने आपले खाद्यान्न बनविल्याने पक्षी पाठ फिरवत आहेत.

ठळक मुद्देपक्ष्यांच्या खाद्यान्नावर माणसं मारतात ताव !

संतोष बुकावन

 लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया  : नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान परिसरात बहुसंख्येने दिसणाऱ्या उघड्या चोचीचा करकोचांची संख्या हल्ली रोडावलेली दिसून येत आहे. करकोचा व इतर पक्ष्यांच्या खाद्यांना मानवाने आपले खाद्यान्न बनविल्याने पक्षी पाठ फिरवत आहेत. प्रकृती नेचर फाउंडेशनने यासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.

            नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान वसाहत संकुल परिसरात निसर्गरम्य तलाव आहे. हा तलाव विस्तीर्ण आहे. तलावाच्या काठावर अनेक गावे वसली आहेत. तलावात विविध प्रकारच्या वनस्पती व जैवविविधतेच्या आकर्षणामुळे देशी व विदेशी पक्षी येथे मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळेच या तलावाची "पक्ष्यांचे माहेरघर" म्हणून सर्वदूर ओळख आहे. हिवाळ्यात येथे दरवर्षी सुमारे चार महिने विदेशी पक्षी मोठ्या संख्येने हमखास दिसून येतात.

तलाव व लगतच्या अधिवासात करकोचा पक्ष्यांचे कवचयुक्त गोगलगाय (ग्रामीण भाषेत घोगोला) हे खाद्य मुबलक प्रमाणात आहेत. हे या पक्ष्यांचे मुख्य खाद्य आहे. त्यामुळे या पक्ष्याला घोघोलेफोड या नावाने स्थानिक परिसरात ओळखले जाते. या खाद्याच्या आकर्षणामुळे करकोचा पक्ष्यांची संख्या या तलावावर मोठ्या प्रमाणात दिसून येत होती. परंतु मानवी हस्तक्षेपामुळे नवेगाव बांध परिसरातील लोक भाजी बनविण्याकरिता घोघोले जमा करतात. यामुळे दिवसेंदिवस खाद्य अपुरे पडल्यामुळे उघड्या चोचीचा करकोचा हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान हे जैवविविधतेने नटलेला निसर्गरम्य परिसर आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने स्थलांतरित पक्षी दरवर्षी येतात. या विविध प्रजातींच्या पक्ष्यांना बघण्याकरिता आणि त्यांचा अभ्यास करण्याकरिता अनेक पर्यटक आणि अभ्यासक मोठ्या संख्येने येतात. या परिसरात करकोचा पक्ष्यांची घरटी मानवी हस्तक्षेपामुळे दिसेनाशी झाली आहेत. येथील स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येत सुद्धा अलीकडे घट झाल्याचे दिसून आले आहे. जैवविविधता आणि नवेगाव बांधच्या समृद्धीमध्ये या पक्ष्याचे मोलाचे योगदान आहे. या पक्ष्यांच्या संख्येत होणारी घट बघता या पक्ष्याचे अस्तित्व नष्ट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

संवर्धनासाठी एक पाऊल.....

उघड्या चोचीचा करकोचा हे पक्षी नवेगाव बांधच्या तलावावर मोठ्या संख्येत दिसून येत होते. हल्ली त्यांची संख्या रोडावली आहे. मानवी हस्तक्षेपामुळे त्यांच्या खाद्यावर आक्रमण होत असल्याने काळाच्या ओघात हा पक्षी नामशेष होण्याची भीती आहे. या पक्ष्याचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने घोघोले जमा करणाऱ्या लोकांवर वेळीच बंधने घालणे आवश्यक आहे. यासंदर्भात वन विभागाचे अधिकारी विजय धांडे, वाघ, दादा राऊत यांना प्रकृती नेचर फाउंडेशनने निवेदन दिले आहे. फाउंडेशनतर्फे नवेगाव बांध,धाबेपवनी, कोहलगाव ग्रामपंचायत तसेच मत्स्य व्यवसाय संस्थांना निवेदन देण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे डॉ. गोपाल पालिवाल, डॉ. शरद मेश्राम, प्रा. अजय राऊत व बाळकृष्ण कुंभरे उपस्थित होते. फाउंडेशनने करकोचा संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य