कर्कश आवाजावर नियंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 09:27 PM2018-09-13T21:27:26+5:302018-09-13T21:28:16+5:30
मिरवणूक म्हटली की डिजे, ढोल, तासे यांचा गजर केला जातो. परंतु यंदा ५० डेसीबल पेक्षा जास्त आवाज नको व गणपती उत्सव आनंदातून साजरा करावा असे ठरविण्यात आले आहे. मिरवणुकीवर होणारा अनावश्यक खर्च टाळून वाचणारे पैसे समाजातील गरजूंना देण्याचा उपक्रम गणेश उत्सव मंडळांच्या सदस्यांनी सुरू करायला हवा अशा प्रतिक्रीया उमटत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मिरवणूक म्हटली की डिजे, ढोल, तासे यांचा गजर केला जातो. परंतु यंदा ५० डेसीबल पेक्षा जास्त आवाज नको व गणपती उत्सव आनंदातून साजरा करावा असे ठरविण्यात आले आहे. मिरवणुकीवर होणारा अनावश्यक खर्च टाळून वाचणारे पैसे समाजातील गरजूंना देण्याचा उपक्रम गणेश उत्सव मंडळांच्या सदस्यांनी सुरू करायला हवा अशा प्रतिक्रीया उमटत आहेत.
शासनाने डिजेच्या आवाजासाठी मुभा द्यावी, अशी गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांची नेहमीच मागणी असते. मात्र सर्व मंडळांनी सायलेन्स झोन मध्ये कर्कश आवाज करू नये, मंदीर, मस्जीद, रूग्णालय या परिसरात कर्कश आवाज करू नये, मिरणूक काढतांना वाहतुकीचे नियम पाळावे, इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच गणेश मंडळांनी आपल्या मंडळांचा आदर्श समाजासमोर उभा राहील असे काम करावे. गणेशोत्सव साजरा करतांना कर्णकर्कश वाद्य वाजवू नये, ५० डेसीबलपेक्षा अधिक आवाज असू नये यासाठी पोलीस अधिक्षकांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन व गणेश मंडळे एकत्र येऊन शांततेने काम करणार आहेत.
विसर्जन करताना पाण्यात मौज-मस्ती करू नये
डिजेवर अश्लील गाणे वाजविणे टाळावे, भक्तीभाव असावा, गुलाल उधळणे बंद करावे, गणेश विसर्जन मिरवणुकीत शक्ती प्रदर्शन नसावे. मिरवणूक काढताना उत्सव मंडळाच्या लोकांनी रस्त्यावरून ये-या करणाऱ्यांचा विचार करून त्यांच्यासाठी जागा सोडावी. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. तसेच विसर्जन करताना पाण्यात मस्ती करणे टाळावे असे ही कळविण्यात आले आहे.
१४ संवेदनशील ठिकाणांमध्ये सडक-अर्जुनी
गणेशोत्सवात जातीय जंगल महाराष्ट्रात यापूर्वी घडल्या आहेत. राज्यात जातीय दंगल होणाºया १४ संवेदनशील ठिकाणांपैकी सडक-अर्जुनी हे एक ठिकाण असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. परंतु महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेने दंगलीने धगधगणाऱ्या सडक-अर्जुनी या गावाला शांत केले. तरीही या गावाकडे शासनाचे लक्ष असते. एकेकाळी गणेशोत्सवादरम्यान हिंदू-मुस्लिमांची भांडणे येथे व्हायची. परंतु महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेने या गावातील लोकांची बैठक घेऊन समन्वय घडवून आणल्याने हे गाव आता शांततेच्या मार्गावर आहे.