गोंदिया : जि.प. शिक्षण विभागाची दप्तर दिरंगाई व आडमुठेपणा यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांना परवानगी न मिळाल्यामळे शेकडो शिक्षक उच्च शिक्षण घेण्यापासून वंचित राहत असल्याचे भयानक वास्तव पुढे आले आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार गोंदिया जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक व माध्यमिक स्तरावर सात हजाराहून अधिक शिक्षक वेगवेगळ्या तालुक्यात कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रातील विविध घडामोडीची वेळोवेळी जाणीव होऊन शिक्षक अद्यावत राहण्यासाठी शिक्षकांना आपली शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. एवढेच नव्हे तर आरटीई २००९ व शासनाच्या वेळोवेळीच्या आदेशानुसार शिक्षकांना आपली शैक्षणिक व व्यावसायीक पात्रता वाढविण्याचे टाईम बॉड (कालावधी ठरलेले) आदेश आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील शेकडो शिक्षक विविध विद्यापीठातून आपली शैक्षणिक व व्यावसायीक पात्रता वाढविण्याचा कशोसीने प्रयत्न करीत आहेत. यासाठी त्यांच्यावर खूप मोठा आर्थिक भुर्दंड ही बसत आहेत. परंतु जि.प. शिक्षण विभागाचा आडमुठेपणा व दप्तर दिरंगाई याकामी आडकाठी पडत आहेत. वारंवार अर्ज करूनही शिक्षकांना उच्च शिक्षणाची परवानगी देण्यात शिक्षण विभागाकडून विलंब केला जात आहे. परवानगी न मिळाल्यामुळे कित्येक शिक्षकांचे शिक्षण अर्धवट अडले आहे. काही शिक्षकांनी शिक्षणाची कार्योत्तर परवानगी मागितली. परंत कार्योत्तर परवानगीही न मिळाल्याने पुढील कार्यवाीस अडथळा होत आहे. विशेष म्हणजे उच्च शिक्षण व कार्योत्तर शिक्षणाची परवानगी घेण्याचा या कार्यवाईस आर्थिक गोरखधंदा बनविलयाचेही वृत्त आहे. वजन ठेवणाऱ्याचेच नाव यादीत समाविष्ट केले जात असल्याचे समजते. दरम्यान सदर प्रक्रियेतील अडथळे दूर करून शिक्षकांना विनाविलंब उच्च शिक्षण व कार्योत्तर शिक्षणाची परवानगी देण्याची मागणी व याकडे जि.प. अध्यक्ष व जि.प. उपाध्यक्ष यांनी खात्रीने लक्ष पुरवून सर्वसमावेशक नवीन यादी तत्काळ प्रकाशित करण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
जिल्ह्यातील शेकडो शिक्षक उच्च शिक्षणापासून वंचित
By admin | Published: August 02, 2015 2:00 AM