लाखोंचे नुकसान : ४५ घरांची पडझडगोरेगाव : तालुक्यातील मुरदोली येथे शुक्रवारी (दि.२६) रात्री ८ वाजता आलेल्या गारपीट व चक्रीवादळामुळे नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यात एकूण ४५ घरांना हाणी पोहोचली.प्राप्त माहितीनुसार, मुरदोली येथे रात्री ८ वाजताच्या सुमारास जोरदार पावसाने, चक्रीवादळ, गारपीठीसह हजेरी लावली. यात मोठमोठी झाडे उन्मळून पडली तर मुरदोली येथील नानू सयाम, रुपचंद परतेती, संतोषी टेकाम यांच्या घरावरील छत उडाले. मदनलाल भेंडारकर यांच्या मालकीचा गुराचा गोठा जमीनदोस्त झाला. इतर ४१ लोकांचे घरावरील कवेलू उडाले. गोंदिया-कोहमारा मार्गावरील झाडे उन्मळून पडल्यामुळे रात्री ८ वाजता काही वेळासाठी वाहतूक बंद पडली होती. वेळीच मुरदोलीचे सरपंच शशी भगत यांनी काही गावकऱ्यांना घेवून रस्ता पूर्ववत केला व वाहतूक सुरळीत सुरू झाली. २४ तासापासून मुरदोली येथे वीज पुरवठा बंद असून अनेक ठिकाणी विद्युत प्रवाह खंडित झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)प्रशासनाची दिरंगाईया चक्रीवादळामुळे मुरदोली येथील नागरिकांचे बरेच नुकसान झाले. काही लोकांच्या घरावरील छत उडाले, कुठे कवेलू उडाले, झाड तुटून पडले. मात्र तालुका प्रशासनाने दखल घेतली नाही. मुरदोली गाव २४ तासांपासून वीज पुरवठ्यापासून वंचित आहे.पुन्हा गारपिटीची शक्यतादरम्यान हवामान विभाग नागपूर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार २७ व २८ फेब्रुवारीपर्यंत विदर्भातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस व गारपीट होण्याची शक्यता वर्तविली आहे. नागरिकांनी जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करु न सतर्क राहावे, असे जिल्हा प्रशासानाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
मुरदोलीला चक्रीवादळाचा फटका
By admin | Published: February 28, 2016 1:43 AM