लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : खैरी-सुकळी येथे वास्तव्य करणाºया मंदा केशव गावडकर यांनी रानभाजी व रानफुलांची जैवविविधता जोपासून उंच भरारी घेतली आहे. त्या गरीब कुटुंबातील असूनही शेती व्यवसायाकडे त्यांचे सर्वाधिक लक्ष आहे. रानभाजी, रानफुलांच्या लागवडीतून आदर्श महिला शेतकरी अशी त्यांची आता त्यांची ओळख निर्माण झाली आहे.त्यांचे मूळ गाव खैरी येथे असून जवळचे कुंभीटोला गाव त्यांचे माहेर आहे. लहानपणापासून शेतीकडे त्यांचा कल होता. त्यांनी पाच वर्षांपासून आपल्या ७५ डिस्मिल शेतीमध्ये १२ पध्दतीच्या मुलकी धानाची लागवड केली. यामध्ये के-१, डी-१, टी-१, एल-१, के-२, बी-१, पी-२, के-३, वाय-१, डी-२, के-४, एच-१ अशा धानाची ९०, १३०, १५० व १६५ दिवसांत पिकांची लागवड केली आहे. याआधी लुचई, ढऊर, लुळका अशा गावरान धानाची रोवणी केली. या धानाला स्वत: तयार केलेली जैविक खत व औषधी दिली.मंदाबाई यांना अनेक प्रकल्पांचे सहकार्य लाभत आहे. राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग जनूकोष कार्यक्रमाचेही मार्गदर्शन लाभत आहे. यामधून प्रात्यक्षिक शेती, मुलकी धान बी-बियाणे शुद्धीकरण व संशोधन केले आहे. तसेच १०८ गुणधर्म तपासणे व चार प्रकारच्या नवीन बियाणांचा त्यांनी शोध केला आहे. मंदा गावडकर यांची विदर्भातून एकमेव उत्कृष्ट महिला शेतकरी म्हणून निवड झाली असून जैविक कृषी विश्वकुंभ दिल्ली येथे नोव्हेंबर महिन्यात सत्कार होणार आहे. त्यांना सुशीला स्वयं सहाय्यता महिला गट खैरी यांच्या सहकार्याने ही गरुड भरारी घेतली आहे. त्यांना टेमकला राऊत, देवेंद्र राऊत, चेतना राऊत, लिला राऊत, कल्पना राऊत, रत्नमाला राऊत, यमुना अलोणे, कृषी सखी अनिता औरासे, लालदास औरासे यांचे सहकार्य लाभले.रानभाजी : कड्डू, तरोटा, लेंगळा, वराकल्या, शेरडिरे, शिलारी, काटेभाजी, कुडवा, माढ, अंबाळी, उंदीरकाण, शेंगा, कोलारी, खापरखटी, पातूर, कोचई, मशाल, कर्मू अशा रानभाज्यांचे संकलन करुन नागरिकांना माहिती देतात व प्रशिक्षण देतात.रानफुले : हेटी, बाहवा, पिंकफर, तुटूंब, डोजबी, कुरमुळी, कमळकांदा, फुल्या, कांदा अशा नैसर्गिक फळाफुलांचे संकलन करुन त्याबाबतच्या माहितीचा त्या प्रसार-प्रचार करतात.त्यांचे ध्येय : जैवविविधता टिकविणे, विषमुक्त अन्न तयार करणे, जैविक खत व औषधी तयार करणे, नैसर्गिक संपत्ती जोपासणे, नव्या पिढीला शेतीकडे वळवून तयार करणे व प्रशिक्षण देणे.
रानभाजी व फुलांची जैवविविधता जोपासणाºया मंदा ठरल्या आदर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 10:10 PM
खैरी-सुकळी येथे वास्तव्य करणाºया मंदा केशव गावडकर यांनी रानभाजी व रानफुलांची जैवविविधता जोपासून उंच भरारी घेतली आहे.
ठळक मुद्देशेतीला साथ : नोव्हेंबरमध्ये दिल्ली येथे होणार सत्कार